टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळं भारताचा हुकमी एक्का कसोटी संघातून बाहेर

टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळं भारताचा हुकमी एक्का कसोटी संघातून बाहेर

2 ऑक्टोबरपासून होणाऱ्या कसोटी मालिकेतून भारताच्या जलद गोलंदाजानं दुखापतीमुळं माघार घेतली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेनंतर 2 ऑक्टोबरपासून या दोन्ही संघात कसोटी मालिका होणार आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार जलद गोलंदाज आणि हुकुमी एक्का जसप्रीत बुमराह यानं कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. बुमराहच्या पाठीला झालेल्या दुखापतीमुळं त्यानं दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बुमराहनं कसोटी मालिकेतून माघार घेतल्यामुळं आता जलद गोलंदाज उमेश यादवला संघात सामिल करण्यात आले आहे. भारताचा पहिला कसोटी सामना 2 ऑक्टोबरला विशाखापटण्णम येथे होणार आहे.

बुमराहशिवाय जलद गोलंदाजी होणार कमकुवत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. दरम्यान बुमराहनं माघार घेतल्यामुळं जलद गोलंदाजीमध्ये भारतीय संघला उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी या तीन गोलंदाजांवर अवलंबून रहावे लागणार आहे. बुमराहनं वेस्ट इंडिज विरोधात हॅट्ट्रिक घेत पाच विकेट घेण्याती कामगिरी केली होती. कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा बुमराह भारताचा तिसरा गोलंदाज आहे. बुमराहनं 12 कसोटीत 5 वेळा एका डावात 5 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि विंडीजविरुद्ध एकाच डावात 5 विकेट घेणारा बुमराह पहिला आशियाई गोलंदाज आहे. त्यामुळं त्याची कमतरता भारताला जाणवणार आहे.

सलामीला नवी जोडी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघानं चमकदार कामगिरी केली खरी, पण सलामीच्या जोडीकडून मात्र निराशा झाली. त्यामुळे आता आफ्रिकेविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल भारतीय डावाची सुरुवात करतील. या जोडीला सूर गवसल्यास आफ्रिकेला नमवणं भारतासाठी सोपं ठरणार आहे.

राहुलला मिळाला डच्चू

सलामीवीर म्हणून सातत्याने मिळालेल्या संधीचा केएल राहुल फायदा उठवू शकला नाही. राहुलने काही वेळा लक्षवेधी कामगिरी केली मात्र त्यामध्ये त्याला सातत्य राखता आलं नाही. त्यामुळे निवड समितीनं त्याला संघातून डच्चू दिला आहे. त्याच्या जागा संधी मिळालेल्या शुभमन गिलकडे आता भारतीय क्रीडा रसिकांचं लक्ष लागलं आहे.

भारताचा कसोटी संघ- विराट कोहली, मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृध्दीमान साह, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गील.

VIDEO: 'हिंदुस्तान आणि पाकिस्तानचं विभाजन सोपं होतं पण युतीची वाटणी सोपी नाही'

First published: September 24, 2019, 5:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading