बुमराहच्या लग्नाची मिस्ट्री! आता समोर आलं मयंती लँगरच्या मैत्रिणीचं नाव

बुमराहच्या लग्नाची मिस्ट्री! आता समोर आलं मयंती लँगरच्या मैत्रिणीचं नाव

टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या चर्चेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टनंतर (India vs England) बुमराहने चौथ्या टेस्टसाठी विश्रांती घेतली. यानंतर बुमराहच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या.

  • Share this:

मुंबई, 5 मार्च : टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या चर्चेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टनंतर (India vs England) बुमराहने चौथ्या टेस्टसाठी विश्रांती घेतली. यानंतर बुमराहच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. आता बुमराह कोणासोबत लग्न करणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. बुमराहच्या होणाऱ्या बायकोबाबत आता वेगवेगळी नावं समोर येत आहेत. सगळ्यात आधी दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनचं (Anupama Parmeswaran) नाव बुमराहशी जोडलं गेलं होतं.

बुमराहने चौथ्या टेस्टमधून विश्रांती घेतल्यानंतर अनुपमाही सुट्टीवर गेली, एवढच नाही तर ती राजकोटलाही रवाना झाली, त्यामुळे या चर्चांनी अजून जोर धरला. पण आता बुमराहचं नाव आणखी एका मुलीशी जोडलं जात आहे. स्पोर्ट्स एँकर संजना गणेशन (Sanjana Ganeshan) सोबत बुमराहचा गोव्यात विवाह होईल, असं बोललं जात आहे.

स्पोर्ट्स कीडाने दिलेल्या वृत्तानुसार बुमराह या आठवड्यात गोव्यात लग्न करेल. यासाठी तो पहिले आपली आई आणि बहिणीसोबत मुंबईला जाईल. कोरोनाचा धोका लक्षात घेता लग्नाला फक्त कुटुंबातील व्यक्तीच सामील होतील. कोरोना संबंधींच्या नियम आणि बायो बबलमुळे भारतीय टीमचे खेळाडूही लग्नाला जाणार नाहीत.

संजना गणेशन हिचं नाव याआधीही जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जात होतं. आता बुमराह नक्की कोणाशी लग्न करणार, याबाबत त्याच्या चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. न्यूज 18 बुमराहच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करत नाही.

Published by: Shreyas
First published: March 5, 2021, 12:16 PM IST

ताज्या बातम्या