IPL 2019 : मुंबईकरांसाठी खुशखबर, बुमराह झाला फिट !

IPL 2019 :  मुंबईकरांसाठी खुशखबर, बुमराह झाला फिट !

मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह फिट असून, गुरुवारी बंगळुरू विरोधात होणारा सामना खेळण्यासाठी तो सज्ज आहे.

  • Share this:

बंगळुरू, 27 मार्च : नेहमीप्रमाणे आपला सलामीचा सामना गमावलेल्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे गुरुवारी एकमेकांविरोधात भिडणार आहेत. पहिला सामना गमावल्यामुळं हे दोन्ही संघ 12व्या हंगामातील आपला पहिला सामना जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. या सामन्यापूर्वी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह फिट असून, गुरुवारी होणारा सामना खेळण्यासाठी तो सज्ज आहे. त्यातच लसिथ मलिंगालाही श्रीलंकन मंडळाने आयपीएल खेळण्याची परवानगी दिल्यानं मुंबई इंडियन्सची बाजू भक्कम झाली आहे.

आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या ओव्हरमध्ये बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली होती. बुमराह फलंदाजीकरिताही मैदानातही उतरला नव्हता. त्यामुळे पुढील सामन्यांतील त्याच्या समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. मात्र, बुधवारी बुमराहनं आपल्या सहकाऱ्यांसोबत कसून सरावही केला. दिल्ली विरुद्धच्या सामन्यानंतर, बुमराह वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू असून त्याची दुखाप गंभीर नाही आहे. बुमराह मुंबईत असून संघाचे फिजीओ त्याच्यासोबत आहेत, असे मुंबई इंडियन्सकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे गुरुवारच्या सामन्यात थेट बुमराह विरुद्ध कोहली असा सामना पाहायला मिळणार आहे.

POINTS TABLE:

SCHEDULE TIME TABLE:

ORANGE CAP:

PURPLE CAP:

RESULTS TABLE:

First published: March 27, 2019, 6:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading