नवी दिल्ली, 03 जुलै : क्रिकेटमध्ये अगदी हुबेहुब दिसणारे क्रिकेटपटूंचे चाहते असतात. विराट कोहलीपासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत अगदी त्यांच्याप्रमाणे दिसणारे चाहते आहे. सध्या सोशल मीडियाव एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसणारा मुलगा हा अगदी हुबहुब भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) कॉपी आहे. मुख्य म्हणजे बुमराहसारखा दिसणारा हा मुलगाही एक खेळाडू आहे.
जसप्रीत बुमराह सारखा दिसणाऱ्या या मुलाचे नाव राज मिश्रा आहे. राज हैदराबादचा स्टेट वॉकर आहे. राजचा चेहरा हा बुमराहशी मिळता जुळता आहे. राज एक राष्ट्रीय खेळाडू असून नॅशनल अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये तो तेलंगणाचे प्रतिनिधित्व करतो. दरम्यान, राजला याबाबत विचारले असता, अनेकदा लोकं बुमराह समजून त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी येतात, असे सांगितले.
वाचा-कोहलीशी करायचं होतं लग्न; इंग्लंडच्या या क्रिकेटरने सर्वांसमोर केलेलं प्रपोज
राज मिश्रा तेलंगणा टुडेशी बोलताना सांगितले की, 'बर्याचदा लोक माझ्याकडे एकटक पाहतात. त्यांना मी जसप्रीत बुमराह आहे की काय, असे वाटते. 2019 च्या राष्ट्रीय खेळात मी पाचव्या क्रमांकावर होतो. मी यावर्षीच्या राष्ट्रीय खेळांच्या प्रतीक्षेत आहे. मात्र कोरोनामुळं या खेळांवर संकट आलं आहे, असेही राज म्हणाला.
वाचा-कोरोनामुळे भारतीय क्रिकेटरच्या वडिलांचा मृत्यू; सेहवागने मागितली होती मदत
विराट कोहलीचाही आहे हुबेहुब दिसणारा चाहता
2016मध्ये एक मुलगा खूप प्रसिद्ध झाला होता, कारण त्याचा चेहरा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली प्रमाणे होते. भारत-न्यूझीलंडमध्ये झालेल्या इंदूरच्या कसोटी सामन्यात हा चाहता दिसून आला.
त्यावेळी लोकं त्याच्यासोबत फोटो काढत होते. विराट कोहलीच्या या चाहत्याचे नाव प्रिन्स आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपू्र्वी एक तुर्की हिरोही विराट कोहलीसारखा दिसतो, असे ट्वीट व्हायरल झाले होते.
वाचा-9 वर्षांची असताना क्रिकेट टीममध्ये झाली दाखल; अनेक रेकॉर्ड तोडून रचला इतिहास
संपादन-प्रियांका गावडे.