भाऊ असावा तर असा! रक्षाबंधनआधीच बुमराहनं बहिणीला दिलं अनोखं सरप्राईज

22 ऑगस्टपासून कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यासाठी जसप्रीत बुमराहची निवड झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2019 07:56 PM IST

भाऊ असावा तर असा! रक्षाबंधनआधीच बुमराहनं बहिणीला दिलं अनोखं सरप्राईज

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. यात टी-20 मालिका भारतीय संघानं खिशात घातल्यानंतर 14 ऑगस्टला तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवत एकदिवसीय सामन्यातही क्लिन स्विपसाठी तयार आहेत. यानंतर भारतीय संघ दोन कसोटी सामने खेळणार आहेत. यात सध्या आराम करत असलेला जसप्रीत बुमराह कसोटी सामन्यांसाठी वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे.

22 ऑगस्टपासून कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. यात टी-20 आणि एकदिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराहला संधी देण्यात आलेली नव्हती, मात्र कसोटी सामन्यात त्याला संघात घेण्यात आले आहे. दरम्यान देश सोडण्याआधी जसप्रीत बुमराहनं आपल्या बहिणीसाठी एक खास गोष्ट केली आहे. रक्षाबंधन गुरुवारी असल्यामुळं वेस्ट इंडिजला रवाना होण्याआधी बहिणीला एक खास सरप्राईज दिले.

बुमरहानं साजरी केली रक्षाबंधन

भारतीय संघाचा जलद गोलंदाज वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी आपली बहिण जुहिका हिच्याकडून राखी बांधून घेतली. रक्षाबंधन 15 ऑगस्टला असली तरी बुमराहनं दौऱ्यावर जाण्याआधीच 2 दिवसआधी साजरी केली. बुमराहनं सोशल मीडियावर याचे फोटो टाकले आहे. यावर, “वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असल्यामुळं ती रक्षाबंधन दिवशी हजर राहणार नाही. पण मी जुहिकासोबत हा दिवस साजरा केल्याशिवाय राहू शकत नाही. माझ्यासोबत नेहमी सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद”, असे लिहिले आहे.

Loading...

भारताचा कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), मयंक अग्रवाल, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

VIDEO : भाजप नगरसेविकेनं पूरग्रस्तांवरच उचलला हात, लोकांनी दिल्या 'भाजप मुर्दाबाद'च्या घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 07:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...