जसप्रीत तू 6 महिनेच खेळशील, बुमराहने केला धक्कादायक खुलासा

"मी फक्त सहा महिने खेळू शकेल असं अनेक लोक आधी म्हणत होते. मात्र मी पहिला बॉल टाकला की त्यांची तोंड बंद होत होती"

  • Share this:

नवी दिल्ली,23 फेब्रुवारी - भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) जेव्हा भारतीय संघात प्रवेश केला तेव्हा त्याच्या कामगिरीने त्यानं आपली संघातील जागा पक्की केली. बुमराह टी20, एकदिवसीय आणि टेस्ट या तिन्ही प्रकारांमध्ये अव्वल ठरला आहे. जेव्हा कधी भारतीय संघाला विकेट्सची आवश्यता भासली त्या त्या वेळी विराट कोहलीने जसप्रीतकडे बॉलिंगची जबाबदारी सोपवली. आणि त्याच्यावर टाकलेला विश्वास बुमराहनेही नेहमीच सार्थ ठरवला. तर एक काळ असा होता की जेव्हा जसप्रीत बुमराहच्या बाबतीत असं म्हटलं जात होतं की तो 6 महिन्यांपेक्षा जास्त खेळू शकणार नाही. याचा खुलासा खुद्द बुमराहनेच केला आहे.

बुमराहवर उठले होते अनेक प्रश्न - जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने 'क्रिकेटबज'ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे की, "काही लोक म्हणायचे की तो 6 महिन्यांपेक्षा जास्त रणजी ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही. बुमराहने सांगितलं की, माझा बांधा सडपातळ होता आणि माझी देहयष्टी पाहिल्यावर लोक मला सहज घेत होते. ते विचार करत होते की हा कशी बॉलिंग करणार? त्यानंतर मी पहिला बॉल जेव्हा टाकत होतो तेव्हा मात्र लोक आश्चर्यचकित होत होते."

लहानपणापासूनच बॉलिंगची आवड - या मुलाखतीत बुमराहने सांगितलं की, त्याला जलदगती बॉलिंगची लहानपणापासून आवड होती. त्याला फलंदाजी अजिबात आवडत नव्हती. त्यानं सांगितलं की, "जेव्हा एखादा बॉलर चांगली कामगिरी करत होता तेव्हा मला मनापासून आनंद होत होता. माझ्या रणजी ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात मी 7 विकेट्स घेतल्याचीही आठवण त्याने सांगितली. त्यानंतर माझ्यात विश्वास निर्माण झाला. आणि त्यानंतर माझं जबरदस्त प्रदर्शन सुरूच राहिलं."

फलंदाजांना शिव्याही देत होता बुमराह - बुमराहची बॉलिंग जेव्हढी वेगवान आहे तेव्हढाच तो स्वभावाला शांत आहे. मात्र त्यानं या मुलाखतीत खुलासा केला आहे की, त्याने अनेक वेळा फलंदाजांना शिव्याही दिल्या आहेत. तो म्हणाला की, मला लहानपमापासूनच खूप राग येत होता. जेव्हा एखादा बॅट्समन माझ्या बॉलवर मोठा फटका लगावत होता तेव्हा मी त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होतो. मी बाऊंसर टाकत होतो. मी त्याच्या जवळ जाऊन त्याला अनेकदा शिव्याही दिल्या आहेत. त्यानंतर माझ्या हळूहळू लक्षात आलं की की हे खेळ सुधारण्यासाठी चांगलं नाही. त्यानंतर मी टेनिस बॉलर यॉर्कर शिकलो.

जसप्रीत बुमराहच्या यॉर्करची दहशत जगभरातील बॅट्समनना आहेत. बुमराहने या मुलाखतीत सांगितलं की, तो यॉर्कर टेनिस बॉलवर खेळतानाच शिकला. लहान असताना जेव्हा तो टेनिस बॉलने क्रिकेट खेळत होता तेव्हा विकेट्स घ्यायचा एकच प्रकार होता आणि तो म्हणजे यॉर्कर. त्यानंतर मी लेदर बॉलने खेळायला सुरू केलं तेव्हा लक्षात आलं की इथे विकेट्स घ्यायला अनेक प्रकार आहेत. इन स्विंग, आऊट स्विंग आहे. तर मी यॉर्कर चांगला टाकतो. आणि ते हत्यार मी नेहमीच वापरत असतो.

विराट, धोनी नाही तर ‘या’ खेळाडूमुळे टीम इंडियाला मिळाला बुमराह!

IPLच्या नव्या जाहिरातीनं उडवली धोनीची खिल्ली, चाहत्यांनी गांगुलीवर काढला राग

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 06:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading