• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 WC : बुडती नाव रोखण्यासाठी West Indies ने ‘या’ धाकड अष्टपैलूला दिली हाक

T20 WC : बुडती नाव रोखण्यासाठी West Indies ने ‘या’ धाकड अष्टपैलूला दिली हाक

Jason Holder

Jason Holder

सलग २ पराभवांसह दिग्गज खेळाडूंचा वेस्ट इंडिज (West Indies Cricket Team) संघ गुणतालिकेत तळाशी आहे. वेस्ट इंडिज संघाचा पुढील सामना बांगलादेश संघाविरुद्ध होणार आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजने संघात मोठा बदल केला आहे.

 • Share this:
  दुबई, 28 ऑक्टोबर: टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या (T20 World Cup 2021) इतिहासात वेस्ट इंडिज संघाने (West Indies Cricket Team) दोन वेळेस जेतेपद पटकावले मात्र, यंदा या संघाला अद्याप विजयाचा सुर गवसलेला नाही. साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. सलग २ पराभवांसह दिग्गज खेळाडूंचा वेस्ट इंडिज संघ गुणतालिकेत तळाशी आहे. वेस्ट इंडिज संघाचा पुढील सामना बांगलादेश संघाविरुद्ध होणार आहे. दरम्यान, बुडती नाव रोखण्यासाठी वेस्ट इंडिजने संघात मोठा बदल केला आहे. शुक्रवारी 29 ऑक्टोबर वेस्ट इंडिज संघाचा पुढील सामना बांगलादेश संघाविरुद्ध रंगणार आहे. शारजाहाच्या मैदानावर पार पडणाऱ्या या सामन्यासाठी वेस्ट इंडिज संघात एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त गोलंदाज ओबेड मॅक्कॉयच्या जागी अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरला (Jason Holder) संधी देण्यात आली आहे.

  वेस्ट इंडिज संघाचा सेमीफानलपर्यंतच प्रवास खडतर

  ओबेड मॅक्कॉय दुखापतीमुळे आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर झाला आहे. ओबेड मॅक्कॉयने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ओबेड मॅक्कॉयला संधी दिली गेली नव्हती. या दोन्ही सामन्यात वेस्ट इंडिज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे वेस्ट इंडिज संघाचा सेमीफानलपर्यंतचा प्रवास खडतर झाला आहे. वेस्ट इंडिज संघातील अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर हा राखीव खेळाडूंमध्ये होता. आता हाच खेळाडू मुख्य संघात खेळणार आहे. जेसन होल्डर गेल्या काही महिन्यांपासून यूएईमध्ये असून तो पूर्णपणे फिट आहे. जेसन होल्डरने यूएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल 2021 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधीत्व करताना अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने सात सामन्यांत 13 बळी घेतले. तसेच, 154 टी-20 सामन्यात 137 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय 127 च्या स्ट्राईक रेटने 1361 धावा केल्या आहेत. ३१ वर्षीय जेसन होल्डरने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे कर्णधार पदही भूषवले आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजचे निवडकर्ते रॉजर हार्पर यांनी “तो एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याला चांगलच माहीत आहे की, मिळालेल्या संधीचा कसा लाभ घ्यायचा आहे.” अशी भावना व्यक्त केली आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: