Japan Open : एकाच खेळाडूनं 6 दिवसांत दुसऱ्यांदा तोडलं सिंधूचं स्वप्न, स्पर्धेतून बाहेर!

Japan Open : एकाच खेळाडूनं 6 दिवसांत दुसऱ्यांदा तोडलं सिंधूचं स्वप्न, स्पर्धेतून बाहेर!

विवारी इंडोनिशिया ओपनच्या अंतिम फेरीतही यामागुचीनं सिंधूला पराभूत केले होते.

  • Share this:

टोकियो, 26 जुलै : भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही सिंधूचे जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या आकाने यामागुची हिचा अडथळा सिंधूला पार करता आला नाही, त्यामुळं 18-21, 15-21 अशा सरळ गेममध्ये सिंधूचा पराभव झाला. विशेष म्हणजे यामागुचीकडून सिंधू गेल्या 6 दिवसांच्या कालावधीत दोन वेळा पराभूत झाली.

याआधी सिंधूनं जापानच्या आया ओहोरीला 11-21, 21-10, 21-13 अशा तीन गेममध्ये पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र फायनलमध्ये यामागुचीकडून सिंधूला पराभव स्विकारावा लागला. रविवारी इंडोनिशिया ओपनच्या अंतिम फेरीतही यामागुचीनं सिंधूला पराभूत केले होते.

वाचा-...म्हणून फलंदाजांची झोप उडवणारा मलिंगा 10 वर्षात घरी गेलाच नाही

आज झालेल्या सामन्यात सिंधूनं सुरुवात चांगली केली. मात्र अटीतटीच्या सामन्यात यामागुचीनं पहिला गेम 21-18च्या फरकानं आपल्या नावावर केला. त्यामुळं दुसऱ्या गेममध्ये सिंधूकडून अपेक्षा होत्या, मात्र दुसऱ्या गेममध्ये पहिल्या गेमपेक्षा वाईट प्रकारे पराभूत झाली. त्यामुळे तिचा या स्पर्धेतील प्रवास संपला.

बी साई प्रणितची सेमीफायनलमध्ये एण्ट्री

सिंधूचा पराभव झाला असला तरी, भारतीय पुरुष संघाचा बी साई प्रणीत ने जापान ओपन स्पर्धेत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत साई प्रणीतनं 21-12 21-15 अशा सरळ गेममध्ये इंडोनेशियाच्या टॉमी सुगिओरटोचा पराभव केला.

वाचा- कोण होणार टीम इंडियाचा कोच? सेहवाग, जयवर्धनेसह 'ही' 4 नावे चर्चेत

वाचा- विराट-रोहितमधील मतभेद टोकाला, हिटमॅनने अनुष्काच्या माध्यमातून असा काढला राग

VIDEO: ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या या आजीबाई नक्की आहेत तरी कोण?

First published: July 26, 2019, 2:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading