कोरोनाचा फटका! 1400 रुपयांसाठी ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू करतोय फूड डिलिव्हरी

कोरोनाचा फटका! 1400 रुपयांसाठी ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू करतोय फूड डिलिव्हरी

पैशांसाठी सायकलवरून 20-24 किमी उन्हातान्हात या खेळाडूवर आली फूड डिलिव्हरी करण्याची वेळ.

  • Share this:

टोकियो, 18 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जवळजवळ सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहेत. तर काही लोकांकडे पैसे नाही आहेत. यामुळं लोकांना जे पडेल ते काम करावं लागत आहे. अशीच वेळ ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूवर आली आहे. कोरोनामुळे जपान ऑलिम्पिक 2020 पुढे ढकलण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, रिओ मियाके लॉकडाऊनमध्ये जपानी तलवारबाज (Fencer) फूड डिलिव्हरी बॉय बनला आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यानं रौप्य पदक आणि 2014 आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

एकीकडे काही खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकची तयारीही केली होती. मात्र कोरोनामुळं आता याच खेळाडूंवर उपासमारीची वेळ आली आहे. सोयीसुविधा नसल्यामुळं या खेळाडूंना आता उपजीविकेसाठी काही तरी काम करावं लागत आहे. यातच लॉकडाऊनमुळं सरावही बंद असल्यामुळं रिओ मियाके (ryo miyake) सध्या सायकलवरून फूड डिलिव्हरी करत आहे.

वाचा-लॉकडाऊनमध्ये कुटुंबासोबत घरात होती मेरी कोम, अचानक आले पोलीस आणि...

रिओ मियाकेनं आपली तलवार बाजूला ठेवत सायकल आणि बॅग घेऊन पैसे कमवण्याचा मार्ग निवडला आहे. उबर इट्सच्या माध्यमातून रिओ लोकांना फूड डिलिव्हरी करतो. यामुळं त्याचा व्यायामही होतो आणि पैसही मिळतात.

वाचा-खेळाडूच्या अलिशान घरात खेळांची मैदाने आणि वाईनसाठी गोडावूनसुद्धा

29 वर्षीय रिओनं लंडन ऑलिम्पिकमध्ये टीम फोईल (तलवार) या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. रिओला प्रत्येक डिलिव्हरी मागे 2 हजार येन म्हणजे 1400 रुपये मिळतात. फक्त एवढेच नाही पैसे कमवण्यासाठी रिओ आणखी मार्गही शोधत आहे. रिओ रोज जवळजवळ 20-25 किमी सायकल चालवतो. यामुळं त्याचा व्यायामही होतो आणि काही पैसही मिळतात.

वाचा-हिंदूच्या मदतीसाठी धावून आला 'हा' पाक क्रिकेटपटू, मंदिरात जाऊन वाटलं रेशन

First published: May 18, 2020, 10:22 AM IST

ताज्या बातम्या