लष्कराच्या वर्दीत धोनीनं केले बूट पॉलिश, PHOTO VIRAL

धोनी आता लष्करात सेवा बजावणार की क्रिकेट खेळणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 06:25 AM IST

लष्कराच्या वर्दीत धोनीनं केले बूट पॉलिश, PHOTO VIRAL

जम्मू, 06 ऑगस्ट : एकीकडे भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी-20 सामन्यात आपला कब्जा करत आहेत. तर, दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ब्रेक घेऊन लष्कराच्या ड्यूटीवर आहेत. धोनी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या विक्टर फोर्समध्ये ट्रेनिंग करत आहे. यातच धोनीचा एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे. धोनी विंडीज दौऱ्यावर जाणार नाही म्हणजे तो निवृत्ती घेणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, धोनी दोन महिने विश्रांती न घेता भारताच्या लष्करात पॅराशूट रेजिमेंटमध्ये ट्रेनिंग घेणार असल्याचे स्पष्ट केले. याआधी धोनीला लेफ्टनंट कर्नलपद मानद बहाल करण्यात आलं आहे.

सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये धोनी लष्कराच्या वेशात ट्रेनिंगआधी आपली बूट पॉलिश करताना दिसत आहे. धोनी लष्कारासोबत ट्रेनिंग घेत असताना जवानांसोबतच वास्तव्य करत आहे. धोनी राहत असलेली खोलीही अगदी लहान आहे. दरम्यान धोनीच्या या फोटोवर चाहत्यांनी, "100 कोटींहून अधिक पैसे कमवणारा धोनी जेव्हा बूट पॉलिश करतो आणि जवानांसोबत राहतो तेव्हा खरी माणुसकी कळते", असे ट्वीट केले होते.

याआधी धोनीचा जवानांसोबत बास्केटबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात धोनी आपल्या सहकाऱ्यांसोबत वेळ घालवतान दिसत आहे.

दरम्यान, धोनीला लष्करप्रमुखांनी रेजिमेंटमध्ये ट्रेनिंगसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे धोनी आता लष्करात सेवा बजावणार की क्रिकेट खेळणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

वाचा- तारीख ठरली! वेस्ट इंडिज दौऱ्यातच टीम इंडियाला मिळणार नवा कोच

'डोंबिवलीचा सुपरमॅन' सांगा कसं चढायचं लोकलमध्ये? एकदा पाहाच हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 06:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...