• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • चोरीच्या आरोपानंतर टीम इंडियाच्या क्रिकेटपटूने सौरव गांगुलीकडे मागितली मदत

चोरीच्या आरोपानंतर टीम इंडियाच्या क्रिकेटपटूने सौरव गांगुलीकडे मागितली मदत

जम्मू-काश्मीरच्या क्रिकेटपटूवर पीच रोलर चोरल्याचा आरोप

जम्मू-काश्मीरच्या क्रिकेटपटूवर पीच रोलर चोरल्याचा आरोप

भारतीय क्रिकेटपटू परवेज रसूल (Parvez Rasool) याच्यावर जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाने (JKCA) पिच रोलर चोरी केल्याचा आरोप केला आहे. रसूलने याप्रकरणी आता बीसीसीआयने (BCCI) दखल द्यावी, अशी मागणी केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 ऑगस्ट : भारतीय क्रिकेटपटू परवेज रसूल (Parvez Rasool) याच्यावर जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाने (JKCA) पिच रोलर चोरी केल्याचा आरोप केला आहे. जेकेसीएने रसूलला पिच रोलर परत करायला सांगितला आहे. रोलर परत केला नाही तर पोलीस कारवाईचा इशाराही रसूलला देण्यात आला आहे. रसूलने याप्रकरणी आता बीसीसीआयने (BCCI) दखल द्यावी, अशी मागणी केली आहे. जम्मू-काश्मीरच्या या क्रिकेटपटूने या आरोपांनंतर आपल्याला त्रास दिला जात आहे, त्यामुळे बीसीसीआयने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली आहे. परवेझ रसूल भारतीय टीमकडून खेळणारा जम्मू-काश्मीरचा एकमेव क्रिकेटपटू आहे. परवेझने जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाने केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे, तसंच अधिकाऱ्यांच्या हेतूंवरही त्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना रसूल म्हणाला, 'पोलीस कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. यानंतर ते मेलमध्ये म्हणाले, आपल्याकडे त्याला संपवण्यासाठी पर्याप्त पुरावे उपलब्ध आहेत का. याचा अर्थ मला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात आहे का? आमच्याकडे खूप पुरावे आहेत आणि पोलीस कारवाई केली जाईल, असं ते सांगतात.' परवेझ रसूल भारताकडून एक वनडे आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. त्याच्या नावावर 3 आंतरराष्ट्रीय विकेट आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 266 विकेट घेतल्या आहेत, तर 61 टी-20 मध्ये त्याला 50 विकेटही मिळाल्या. रसूलला एक लांब दोरी दिली पाहिजे, त्यामुळे त्याला फाशी देता येईल, असं ट्वीट जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाच्या एका अधिकाऱ्याने केल्याचा आरोपही रसूलने केला आहे. हे ट्वीट नंतर डिलीट करण्यात आलं.
  Published by:Shreyas
  First published: