विराटच्या कोचकडून क्रिकेटचे धडे, बॅडमिंटन खेळणारी 'ती' झाली भारताची ओपनर

तिच्या वडीलांनी जयपूरमध्ये सिकर रोडवर एक मैदानही तयार केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 9, 2019 12:18 PM IST

विराटच्या कोचकडून क्रिकेटचे धडे, बॅडमिंटन खेळणारी 'ती' झाली भारताची ओपनर

भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड यांच्यात तीन टी20 सामन्यांची  मालिका सुरू आहे. यात भारताकडून प्रिया पुनियाने पदार्पण केलं. मात्र सलामीला खेळताना प्रियाला दोन्ही सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. तरीही प्रियाकडून असलेल्या अपेक्षा कमी झालेल्या नाहीत.

राजस्थानातील चूरु जिल्ह्यात जनाऊ खारी गावातून आलेल्या प्रियाची गेल्या वर्षी भारताच्या महिला टी20 संघात निवड झाली आहे.

प्रियाला पहिल्यांदा बॅडमिंटन खेळायला आवडत होतं. पण नंतर तिने सुराणा अॅकडमीत क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली.

Loading...

प्रिया पुनियाचे वडील सुरेंद्र पुनिया जयपूर मध्ये भारतीय सर्वेक्षण विभागात हेड क्लार्क म्हणून काम करतात. प्रियासाठी तिच्या वडीलांनी जयपूरमध्ये सिकर रोडवर एक मैदानही तयार केलं आहे.

जयपूरमध्ये 6 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर प्रियाचे कुटुंबीय दिल्लीला आले. तेव्हा प्रियाने राजकुमार शर्मा यांच्या अॅकॅडमीत सरावाला सुरुवात केली.

2008 ते 2015 या कालावधीत भारताचा कर्णधार विराट कोहलीचे प्रशिक्षक असलेल्या राजकुमार यांच्याकडून प्रियाने प्रशिक्षण घेतल.

प्रियाने तिचं शिक्षण जीजस अॅण्ड मेरी कॉलेसमधून केल आहे. सध्या ती जयपूरमध्ये राहते.

सलामीला फलंदाजी करणारी प्रिया आतापर्यंत फक्त दिल्लीकडून खेळली आहे.

बेंगळुरुत सिनीअर महिला वनडे चॅम्पियनशिप स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना प्रियाने ८ सामन्यात 50 च्या सरासरीने 407 धावा काढल्या होत्या.

प्रियाने तामिळनाडूविरुद्ध 143 आणि गुजरातविरुद्ध 125 धावा  काढल्या होत्या. त्यानंतर तिचा समावेश भारताच्या महिला टी20 संघात करण्यात आला होता.

आतापर्यंत प्रिया दिल्लीकडून अंडर-19, अंडर-23 आणि सिनिअर गटातून खेळली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 12:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...