Home /News /sport /

जॅक कॅलिसची नवी इनिंग, या टीमचा बॅटिंग सल्लागार म्हणून नियुक्ती

जॅक कॅलिसची नवी इनिंग, या टीमचा बॅटिंग सल्लागार म्हणून नियुक्ती

दक्षिण आफ्रिकेचा महान ऑलराऊंडर जॅक कॅलिस (Jacques Kallis) त्याच्या क्रिकेटमधल्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. पुढच्या महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी कॅलिसची इंग्लंडचा (England vs Sri Lanka) बॅटिंग सल्लागार म्हणून निवड झाली आहे.

पुढे वाचा ...
    लंडन, 22 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेचा महान ऑलराऊंडर जॅक कॅलिस (Jacques Kallis) त्याच्या क्रिकेटमधल्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. पुढच्या महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी कॅलिसची इंग्लंडचा (England vs Sri Lanka) बॅटिंग सल्लागार म्हणून निवड झाली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) याबाबतची घोषणा केली आहे. इंग्लंडची टीम 2 जानेवारीला श्रीलंकेला रवाना होणार आहे, टीमसोबत 7 प्रशिक्षक जाणार आहेत. 45 वर्षाच्या जॅक कॅलिसने मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेसाठी इंग्लंड दौऱ्यात हीच जबाबदारी पार पाडली होती. आता तो पहिल्यांदाच दुसऱ्या टीमसाठी हे काम करणार आहे. कॅलिसने दक्षिण आफ्रिकेसाठी 166 टेस्ट मॅचमध्ये 55.37 च्या सरासरीने 13,298 रन केले, याचसोबत त्याने 292 विकेटही घेतल्या. गॉलमध्ये होणार दोन्ही टेस्ट श्रीलंका दौऱ्यानंतर इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे, पण यासाठी जॅक कॅलिसची नियुक्ती करण्यात आली आहे का नाही, याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडचा माजी बॅट्समन पॉल कॉलिंगवूड मुख्य प्रशिक्षक क्रीस सिल्व्हरवूड यांचे सहाय्यक असतील, तर जॉन लुईस बॉलिंग प्रशिक्षक असतील. जीतन पटेल स्पिन बॉलिंग सल्लागार आणि कार्ल हॉपकिन्स फिल्डिंग प्रशिक्षक, जेम्स फॉस्टर विकेट कीपिंग सल्लागार असतील. या सीरिजच्या दोन्ही टेस्ट मॅच गॉलमध्ये 14-18 जानेवारी आणि 22-26 जानेवारी दरम्यान होणार आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या