मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'हे माझं कर्तव्य आहे', मैदानावर ड्रिंक्स घेऊन जाणाऱ्या CSKच्या स्टार गोलंदाजाची पोस्ट व्हायरल

'हे माझं कर्तव्य आहे', मैदानावर ड्रिंक्स घेऊन जाणाऱ्या CSKच्या स्टार गोलंदाजाची पोस्ट व्हायरल

दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इम्रान ताहीर (Imran Tahir) हा सध्या चेन्नई सुपर किंग्सच्या 11 खेळाडूंमध्ये नसला तरी तो त्या 11 खेळाडूंना प्रोत्साहित करताना, त्यांना ड्रिंक्स देताना दिसत आहे.

    मुंबई, 15 ऑक्टोबर : सध्या सगळे घरात बसूनच आयपीएलचा (IPL 2020) आनंद लुटत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इम्रान ताहीर (Imran Tahir) हा सध्या चेन्नई सुपर किंग्सच्या 11 खेळाडूंमध्ये नसला तरी तो त्या 11 खेळाडूंना प्रोत्साहित करताना, त्यांना ड्रिंक्स देताना दिसत आहे. याबद्दल त्याने एक ट्वीट देखील केले आहे. ताहीरची ही पोस्ट वाचून अनेक जण त्याला चिअर करत आहेत. आयपीएल 2019 मध्ये ताहीरने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना 26 विकेट्स घेतल्या होत्या. त्यासाठी त्याला पर्पल कॅप देखील मिळाली होती. परंतु, या वर्षी तो टीममध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी ड्रिंक्स देताना दिसत आहे. ट्विटरवर ताहीरने असं म्हटलं आहे की, 'गेल्यावर्षी जेव्हा मी खेळात होतो, तेव्हा काहींनी मला ड्रिंक्स देऊन मला खेळण्यासाठी प्रोत्साहित केले होते. त्यांच्या उपकारांची परतफेड मी या वर्षी करत आहे. आता मी खेळात असो किंवा नसो किंवा मला पुढे खेळायची संधी जरी मिळाली तरी मी नक्कीच माझी जबाबदारी पार पाडेन. मी माझ्या टीमला जिंकून देण्यासाठी काहीही करू शकतो'. त्याची ही पोस्ट त्याच्या फॅन्सनी खूपच उचलून धरली आहे. त्या पोस्टवर त्याच्या फॅन्सनी बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत. ज्यावरून इम्रान ताहिर त्याच्या खेळण्यावरून लोकांना किती आवडतो हे दिसून येत आहे. एका चाहत्याने लिहिले आहे की, 'सर, तुम्ही तुमच्या खिलाडूवृत्तीने तुमच्याबद्दलचा आदर अजून वाढवला आहे. यावरून तुम्ही तुमची माणुसकी दाखवली आहे'. तर आणखी एकाने असे म्हटले आहे की, 'तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात. अशा परिस्थितीला कसं सामोरं गेलं पाहिजे, हे तुम्ही आम्हाला आज शिकवलंत'. त्याच्या नम्रपणांचं कौतुक या पोस्टमधून होत आहे. अशा अनेक पोस्ट ताहीरच्या ट्वीटवर आल्या आहेत. लवकरच ताहीर चेन्नई सुपर किंग्सच्या टीम 11 मध्ये दिसला तर ती नक्कीच त्याच्यासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असेल. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितलेप्रमाणे, इम्रान ताहीर नक्कीच या टीममध्ये खेळताना दिसेल. परंतु सध्याच्या अटींनुसार संघाची रचना दोन अष्टपैलू फलंदाज आणि ऑल राऊंडर गोलंदाजी करणारे खेळाडू अशी करण्यात आली आहे. तो आता सेकेंड हाफमध्ये विकेट घेण्यासाठी सज्ज होईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या