VIDEO : भरमैदानात चाहत्यानं महिला अँकरला म्हटलं टीशर्ट काढ, तिने 'असं' दिलं उत्तर

VIDEO : भरमैदानात चाहत्यानं महिला अँकरला म्हटलं टीशर्ट काढ, तिने 'असं' दिलं उत्तर

महिला अँकर मैदानावर दिसताच चाहत्यांनी शेरेबाजी सुरू केली. त्यानंतर अचानक एका चाहत्याने तिला टीशर्ट काढ असं म्हटलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर : इतर खेळांच्या तुलनेत फुटबॉलचे चाहते अनेकदा मैदानात घुसतात. तसेच ते हुल्लडबाजी करून गोंधळही करतात. आता इटलीतील एका लीगदरम्यान चाहत्यानं महिला अँकरवर अश्लील शेरेबाजी केली. इटलीतील सान पाउलो स्टेडियमवर नेपोली आणि ब्रेशिया यांच्यात सामना सुरू होता. या सामन्यावेळी इटालियन स्पोर्ट्स अँकर डॉयल्टा लेओटा स्टेडियममध्ये होती. तिला पाहताच नेपोली फुटबॉल क्लबच्या चाहत्यांनी शेरेबाजी करायला सुरूवात केली. यावेळी एका चाहत्यानं तर तिला टीशर्ट काढण्यास सांगितलं.

नेपोलीच्या चाहत्यांच्या अपशब्दातील टीप्पणीला अँकर डॉयल्टा लेओटानं सहजपणे उत्तर दिलं. तिने कोणताही आक्रमकपणा न दाखवता हसत हसत अंगठ्याने इशारा करत नाही म्हणून सांगितलं. डॉयल्टा लेओटाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इटलीतील प्रसिद्ध व्यक्तींपैकी लेओटा एक आहे. सोशल मीडियावरही तिचे 4.5 मिलियन चाहते आहेत. तिने 2009 मध्ये मिस इटली स्पर्धेत मिस एलिगेंट पुरस्कार पटकावला होता. 2017 मध्ये तिचा न्यूड फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. हॅकर्सने तिचे फोटो चोरले होते. त्यानंतर इंटरनेटवर अपलोड केले होते.

VIDEO: प्रशासनाच्या भोंगळ कारभार; कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: football
First Published: Oct 4, 2019 08:16 AM IST

ताज्या बातम्या