ISSF World Cup : यशस्विनीनं जिंकलं गोल्ड, ऑलिम्पिकसाठी पात्र

ISSF World Cup : यशस्विनीनं जिंकलं गोल्ड, ऑलिम्पिकसाठी पात्र

22 वर्षीय यशस्विनीने ISSF World Cup स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं.

  • Share this:

यो डी जेनेरिओ, 01 सप्टेंबर : शूटिंग वर्ल्ड कपमध्ये भारतीय नेमबाजांची विजयी घोडदौड सुरू आहे. यशस्विनी देसवाल हिने शनिवारी सुवर्णपदक जिंकलं. या पदकासह ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत 22 वर्षीय़ यशस्विनीनं सुवर्ण पटकावून देशाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला.

माजी ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या 22 वर्षीय यशस्विनीने 8 महिलांना मागे टाकत सुवर्ण पदकावर नाव कोरलं. तिनं अंतिम फेरीत 236.7 गुण मिळवले. जगातील नंबर एकची ओलेना कोस्तेविचला रौप्य पदक आणि सार्बियाच्यी जेसमिना मिलावोनोविचला कांस्य पदक मिळालं.

यशस्विनी ISSF World Cup मध्ये दुसरं सुवर्ण पदक जिंकणारी दुसरी महिला नेमबाज ठरली आहे. यशस्विनीच्या आधी या वर्ल्ड कपच्या पहिल्याच दिवशी इलावेनिल वालारिवानने 10 मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्ण जिंकलं होतं.

इलावेनिलनं 629.4 गुण मिळवले होते तर अंजुमनं 629.1 गुण मिळवले. अपूर्वीनं 627.7 गुण मिळवले. ती 11 व्या स्थानी राहिली. पहिल्या आठ स्थानांवर असलेल्यांना अंतिम फेरीत स्थान मिळालं. शूटिंग वर्ल्डच्या या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी इलावेनिल तिसरी भारतीय महिला ठरली होती. तिच्यापूर्वी अपूर्वी चंडेला आणि अंजली भागवत यांनी अशी कामगिरी केली होती. यामध्ये आता यशस्विनी चौथी भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.

भारताच्या अन्नु राज सिंग आणि श्वेता सिंग यांना अंतिम फेरीत स्थान मिळवता आलं नाही. तर भारताच्या मनु भाकरनं 580 गुण मिळवले.

VIDEO :...जर सेनासोबत नसेल तर भाजपला इतक्या जागा, आठवलेंचं भाकीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shooting
First Published: Sep 1, 2019 08:12 AM IST

ताज्या बातम्या