ISSF World Cup : मनु भाकर- सौरभ चौधरीचा सुवर्णवेध

ISSF World Cup : मनु भाकर- सौरभ चौधरीचा सुवर्णवेध

भारतीय नेमबाजांची सोनेरी कामगिरी, मिश्र प्रकारात दोन सुवर्ण

  • Share this:

बीजिंग, 25 एप्रिल : ISSF World Cup मध्ये भारतीय नेमबाज मनु भाकर-सौरभ चौधरी आणि अंजुम मोदगिल-दिव्यांश पवार यांच्या जोडीने सुवर्णपदकावर नाव कोरले. शूटिंग वर्ल्कपमध्ये अंजुम आणि दिव्यांश यांनी भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले. त्यांच्यानंतर 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात मनु भाकर आणि सौरभ चौधरीने सुवर्ण पदकावर नाव कोरले.

अंजुम मोदगिल आणि दिव्यांश पवार यांनी 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात चीनी जोडी लियु रुक्सुआन आणि यांग हारोन यांचा पराभव केला. एकवेळ चीनच्या नेमबाजांनी 13-11 ने आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर अंजुम-दिव्यांशने सामना बरोबरीत आणला आणि शेवटी 17-15 ने विजय मिळवला.

जत्रेत फुगे फोडायच्या नादाने शिकला नेमबाजी, विश्वविक्रमी सुवर्णवेध घेणाऱ्या सौरभ चौधरीची प्रेरणादायी कहाणी

पहिले सुवर्णपदक मिळवल्यानंतर मनु भाकर-सौरभ चौधरी यांनी दुसऱे सुवर्णपदक मिळवले. या दोघांनीसुद्धा चीनच्या खेळाडूंविरुद्ध खेळताना पदकावर नाव कोरले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात मनु-सौरभच्या जोडीने 16-6 ने विजय मिळवला.

मौत का कुऑं! स्टंटमननं जवळून पाहिला मृत्यू, थरारक घटनेचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2019 05:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading