आयएसएलच्या चौथ्या हंगामाला आजपासून सुरुवात

आयएसएलच्या चौथ्या हंगामाला आजपासून सुरुवात

आयएसएलच्या चौथ्या हंगामाला आजपासून सुरुवात होतेय. कोचीमध्ये रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

  • Share this:

अमित मोडक, 17 नोव्हेंबर : आयएसएलच्या चौथ्या हंगामाला आजपासून सुरुवात होतेय. कोचीमध्ये रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. सलमान खान आणि कतरिनाचा परफॉर्मन्स हे प्रमुख आकर्षण असणार आहे. बॉलिवूड धमाक्यानंतर  आयएसएल धमाका सुरू होणार आहे.

गतविजेती एटीके आणि केरळा ब्लास्टर्स याच्या लढतीनं चौथा हंगामाला सुरूवात होईल. कोलकात्त्यानं पहिल्या सिझनपासून आयएसएलवर वर्चस्व गाजवलंय. त्यामुळे या सिझनमधेही त्यांच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.आयएसएलच्या वाढत्या लोकप्रियतेनंतर , टीम्सची संख्या वाढलीये.

क्लब्ससोबतच आता मॅचेसची संख्याही वाढलीये. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये सुरू झालेला हा सिझन मार्चपर्यंत चालणार आहे. मैदानावरची खुन्नस...गोल्स...आणि  फॅन्सचा जल्लोष...पुढचे 3 महिने चालणार आहे. भारतीय फुटबॉलचा चेहरा बनत चाललेली ही इंडियन सुपर लीग यावर्षी कुठले नवे रेकॉर्ड्स करते याकडे फॅन्सचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 04:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...