IPL 2019 : असं केलं ईशांतनं डेण्टलीचं स्वागत...सगळेच झाले थक्क, पाहा VIDEO

IPL 2019 : असं केलं ईशांतनं डेण्टलीचं स्वागत...सगळेच झाले थक्क, पाहा VIDEO

दिल्लीनं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार श्रेयस अय्यरचा हा निर्णय पहिल्याच चेंडूत इशांत शर्मानं सार्थ ठरवला.

  • Share this:

कोलकाता, 12 एप्रिल: कोलकाता आणि दिल्ली यांच्यात ईडन गार्डनवर सुरु असलेल्या सामन्यात दिल्लीनं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार श्रेयस अय्यरचा हा निर्णय पहिल्याच चेंडूत इशांत शर्मानं सार्थ ठरवला.

कोलकातानं आपल्या दोन सलामी फलंदाज सुनील नारायण आणि क्रिस लीन यांना विश्रांती देत जो डेण्टली याला संघात स्थान दिलं. पण पहिल्यात सामन्यात या पट्ट्याला आपला भोपाळाही फोडता आला नाही. ईशांत शर्माच्या जादू पुढं डेण्टलीचा टिकाव लागला नाही. शर्माच्या पहिल्याच चेंडूत डेण्टली त्रिफळाचीत झाला, आणि ईशांतनं हम भी किसीसे कम नहीं, असं काहीसं सेलिब्रेशनही केलं. दरम्यान एक विकेट घेत शर्मानं आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव दिली नाही.

सध्या रसेलच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर सहा सामन्यांत आठ गुण मिळवणाऱ्या कोलकाता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, कोलकताला चेन्नई विरोधात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळं पुन्हा विजयीपथावर येण्यासाठी कोलकाता प्रयत्नात आहे.

तर, दिल्लीचा संघ सहा सामन्यात तीनच सामने जिंकू शकले आहेत. आता हंगामातील चौथा विजय साकारून गुणतालिकेतील अव्वल पाच संघांमध्ये पोहोचण्यासाठी दिल्ली उत्सुक आहे. दिल्लीच्या वेगवान माऱ्याची धुरा दक्षिण आफ्रिकेचा २३ वर्षीय वेगवान गोलंदाज रबाडा सांभाळत आहे. या सामन्यात खेळपट्टीची भूमिकासुद्धा महत्त्वाची असणार आहे. दरम्यान या सामन्यात कोलकातचं पारडं जड असलं तरी, दिल्लीकडूनही तेवढ्याच अपेक्षा आहेत.

VIDEO : मावळमध्ये पार्थची उमेदवारी रिस्क आहे का? अजित पवार म्हणतात...

First published: April 12, 2019, 8:26 PM IST

ताज्या बातम्या