नवी दिल्ली, 26 मार्च : आयपीएलच्या 12व्या हंगामाला सुरूवात होऊन तीन दिवसचं झाले असताना, पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटले आहे. आर. अश्विननं राजस्थान आणि पंजाब विरुद्धच्या सामन्यात बटरलला ज्या पद्धतीने बाद केलं, त्यावरून सोशल मीडियात टोकाच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. त्यातच आता चेन्नई आणि दिल्ली यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात दिल्लीचा गोलंदाज इशांत शर्मा आणि चेन्नईचा फलंदाज शेन वॉटसन भिडले. तर, झालं असं की, इशांत शर्मानं रायडूला बाद केल्यानंतर, सेलिब्रेशन करत असताना वॉटसननं रोखून ईशांत शर्माकडं पाहिलं आणि मग शर्मानं डोळं दाखवू नको असा इशारा दिला. यावेळी समालोचन करणारे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कार दोघांवर चांगलेच भडकले. गावस्कर यांनी, कुठं गेलं क्रिकेट स्पिरीट? असा सवाल केला.
Watson riles up Ishant https://t.co/QS6YgH50Rj via @ipl
— Akshay Shitole (@AkshayShitole21) March 26, 2019
हा वाद शमतो न् शमतो तेव्हाच वॉटसन आणि दिल्लीचा जलद गोलंदाज रबाडा हे ही भिडले, यावेळी पंचांना मध्यस्थी करावी लागली. दिल्ली आणि चेन्नई यांच्यात फिरोज शाहा कोटला मैदानावर सामना सुरू असून, दिल्लीनं
टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र, ब्राव्होच्या गोलंदाजीपुढं दिल्लीचे फलंदाज जास्त काळ टिकू शकले नाहीत. त्यामुळे दिल्लीकडून चेन्नईसमोर 148 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. या धाव संख्येचा पाठलाग करत असताना, शेन वॉटसननं सर्वाधिक 44 धावा केल्या आहेत.
सहा भाषेत बोलते धोनीची लेक; पाहा बाप-लेकीचा 'हा' VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा