VIDEO : जेव्हा इशांत शर्मा रोहितला धमकावतो तेव्हा...

VIDEO : जेव्हा इशांत शर्मा रोहितला धमकावतो तेव्हा...

दिल्लीच्या वादग्रस्त कोटला मैदानावर मुंबई आणि दिल्लीमधल्या खेळाडूंमध्येही चुरस पाहायला मिळाली.

  • Share this:

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : आयपीएलच्या बाराव्या हंगामात सध्या प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी सर्व संघांमध्ये लढत सुरू झाली आहे. अशीच काहीशी लढत संघातील खेळाडूंमध्येही पाहायला मिळत आहे.

आज मुंबई आणि दिल्ली याच्यांत झालेल्या सामन्यातही असाच काहीसा हास्यास्पद प्रसंग पाहायला मिळाला. मुंबईनं 40 धावांना हा सामना जिंकला. मात्र, हा सामना गाजवला तो फिरकी गोलंदाजांनी. दरम्यान, या दिल्लीच्या वादग्रस्त कोटला मैदानावर खेळाडूंमध्येही चुरस पाहायला मिळाली.

मुंबईनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सलामीसाठी उतरलेल्या रोहित शर्मा आणि डी कॉकनं चांगली सुरुवात केली. पण क्रिकेटच्या मैदानावर शर्मा विरुद्ध शर्मा असा खेळ पाहायला मिळाला. इशांत शर्माच्या पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्या दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्माला फसवण्याचा प्रयत्न इशांतनं केला. इशांतनं जलद गोलंदाजी करत रोहितचा आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, पण रोहितला तो चेंडू टोलवताही आला नाही. यानंतर इशांतनं रोहितकडं बघुन तुला वाटतं तु मला मारशील? असा काहीसा लुक दिला. ज्यावर रोहित शर्माही हसला.मात्र, 30 धावा करत शर्मानं नाही तर, अमित मिश्रानं रोहितची विकेट घेतली. आश्चर्याची बाब म्हणजे मिश्रानं तब्बल 6वेळा रोहितला बाद केलं आहे. दरम्यान आपल्या पराभवाचा वचपा काढत मुंबईनं दिल्लीला 40 धावांनी नमवले. 169 धावांचा पाठलाग करताना, दिल्लीच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. दिल्लीचा संपुर्ण संघ अवघ्या 125 धावांवर बाद झाला.राहुल चहरच्या फिरकीपुढं दिल्लीच्या गोलंदाजांनी नांगी टाकली. राहुल चहरनं आपल्या 4 ओव्हरमध्ये 4.75च्या सरासरीनं केवळ 19 धावा दिल्या. राहुलनं महत्त्वाचे फलंदाज पृथ्वी शॉ, शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर यांना स्वस्तात बाद केलं.

त्याआधी शिखर धवननं आक्रमक फलंदाजी केली खरी, पण कोणत्याही फलंदाजाला विशेष यश आले नाही. त्यानंतर अक्सर पटेलनं काहीसा प्रयत्न केला, पण त्याच्या एकाकी झुंजी पुढं दिल्लीचा संघ तारू शकला नाही. अक्सर 26 धावा करत बाद झाला.

मुंबईकडून राहुल चहरनं 3, बुमराहनं 2 तर, मलिंगा आणि कृणाल पांड्यानं प्रत्येकी एक विकेट घेतल्या. पण आजचा दिवस गाजवला तो, फिरकी गोलंदाजांनी. दिल्लीकडूनही अमित मिश्रानं उत्तम गोलंदाजी केली.मोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 11:45 PM IST

ताज्या बातम्या