मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पांड्यानंतर Ishan Kishanही भावुक, Video शेअर करत म्हणाला, ‘तुम्ही माझे आयुष्य...

पांड्यानंतर Ishan Kishanही भावुक, Video शेअर करत म्हणाला, ‘तुम्ही माझे आयुष्य...

Ishan Kishan

Ishan Kishan

आयपीएल 2022 (IPL 2022) साठी मुंबई इंडियन्सने (MI) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासह(Hardik Pandya) युवा फलंदाज ईशान किशनलाही (Ishan Kishan) डच्चू दिला आहे.

मुंबई, 3 डिसेंबर: आयपीएल 2022 (IPL 2022) साठी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासह(Hardik Pandya) युवा फलंदाज ईशान किशनलाही (Ishan Kishan) डच्चू दिला आहे. तो देखील लिलावासाठी उपलब्ध आहे. आता याच पार्श्वभूमीवर ईशानने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फलंदाज सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू कायरन पोलार्ड या चौघांना पुढच्या वर्षीसाठी संघात कायम ठेवले आहे. याच पार्श्वभूमीवर ईशान किशनसह मुंबई इंडियन्सच्या इतर दिग्गज खेळाडूंना संघाची साथ सोडावी लागली. यामध्ये हार्दिक पंड्या, क्विंटन डी कॉक यांच्या नावांचा समावेश आहे. तत्पूर्वी ईशान किशन मागच्या चार हंगामांपासून मुंबई संघाचा महत्वाचा भाग राहिला आहे. त्याने यादरम्यानच्या काळात संघासाठी अप्रतिम प्रदर्शन केले आणि भारतीय संघात देखील स्वतःचे स्थान पक्के केले.

ईशान किशनने सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सची साथ सोडल्यानंतर एका भावूक संदेशासह एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने मुंबई संघासोबत घालवलेल्या क्षणांचे अनेक फोटो आहेत.

ईशान किशनने या व्हिडिओच्या कॅप्शनमद्ये लिहिले की, ‘हा एक असा प्रवास राहिला आहे, ज्याने प्रोफेशनली आणि व्यक्तिगत रूपात माझे आयुष्य बदलले. मी याठिकाणी मित्र बनवले. मी एका खेळाडू आणि व्यक्तिच्या रूपात याठिकाणी विकसित झालो आणि या अप्रतिम अनुभवासाठी नेहमी आभारी आहे. मुंबई इंडियन्समध्ये सर्वाचे प्रेम, पाठींबा आणि आठवणींसाठी धन्यवाद आणि सोबतच अद्भुत चाहत्यांसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद.’ ईशान सध्या भारत अ संघाचा भाग असून, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.

आयपीएलमध्ये पुढच्या वर्षी दोन फ्रेंचायझी नव्याने सामील होणार आहेत. यासाठी पुढच्या हंगामापूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव देखील होणार आहे. या मेगा लिलावात अनेक दिग्गज सहभाग घेतील.

First published:

Tags: Hardik pandya, Ipl 2022, Ipl 2022 auction, Ishan kishan, Mumbai Indians, Rohit sharma