मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ind vs NZ: मॅचआधी मैदानाबाहेरच थांबले भारतीय ओपनर्स... ईशान किशनकडून झाली होती 'ही' मोठी चूक

Ind vs NZ: मॅचआधी मैदानाबाहेरच थांबले भारतीय ओपनर्स... ईशान किशनकडून झाली होती 'ही' मोठी चूक

इशान किशन आणि रिषभ पंत

इशान किशन आणि रिषभ पंत

Ind vs NZ: रिषभ पंत आणि ईशान किशन हे भारतीय ओपनर्स ड्रेसिंग रुमबाहेर पडले. पण मैदानात पाय ठेवण्याआधीच ईशान किशनला आपली एक चूक लक्षात आली आणि दोन्ही ओपनर्स मैदानाबाहेरच थांबून राहिले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

माऊंट माँगानुई, 19 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड संघातल्या दुसऱ्या टी20 सामन्यादरम्यान एक मजेशीर घटना घडली. मॅचआधी न्यूझीलंडनं टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर रिषभ पंत आणि ईशान किशन हे भारतीय ओपनर्स ड्रेसिंग रुमबाहेर पडले. पण मैदानात पाय ठेवण्याआधीच ईशान किशनला आपली एक चूक लक्षात आली आणि दोन्ही ओपनर्स मैदानाबाहेरच थांबून राहिले होते. पण त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

ईशाननं काय केली होती चूक?

ड्रेसिंग रुममधून बाहेर पडताना ईशान किशननं एकाच हाताचे दोन ग्लोव्हज सोबत आणले होते. मैदानात पाय ठेवण्याआधी त्याच्या ही गोष्ट लक्षात आली आणि म्हणूनच ईशान आणि रिषभ दोघंही बाऊंड्री लाईनजवळ थांबून राहिले. त्यानंतर शार्दूल ठाकूरनं ईशानचा ग्लोव्हज आणून दिला आणि दोघेही ओपनर्स मैदानात उतरले.

भारताचा धावांचा डोंगर

न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याच्यावरच उलटला. कारण भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या आक्रमणाचा चांगलाच समाचार घेतला. सूर्यकुमार यादवचं शतक हे सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं. त्यानं अवघ्या 51 बॉलमध्ये नाबाद 111 धावांची खेळी केली. तर ईशान किशननं 56 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला 6 बाद 191 धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून टिम साऊदीनं हॅटट्रिकची नोंद केली. त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्या, दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदरला माघारी धाडलं आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसरी हॅटट्रिक पूर्ण केली.

हेही वाचा - MS Dhoni: धोनीच्या घरी 'नवी पाहुणी'... शुभेच्छा देण्यासाठी केदार जाधव, ऋतुराज पोहोचले रांचीत; Video

सूर्याचं दुसरं शतक

सूर्यकुमार यादवनं टी20 क्रिकेटमधला आपला सुपर फॉर्म कायम राखला आहे. माऊंट माँगानुईच्या बे ओव्हल मैदानात त्यानं चौफेर फटकेबाजी करत शतक झळकावलं. यंदाच्या वर्षात सूर्यकुमारच्या बॅटमधून निघालेलं हे दुसरं टी20 आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. याआधी त्यानं इंग्लंड दौऱ्यात 117 धावांची खेळी केली होती.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sports, T20 cricket, Team india