मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Video...अन् पंजाबी भाषेत किवींचा खेळाडू करु लागला कॉमेंट्री; हिंदी बोलण्यास दिला होता नकार

Video...अन् पंजाबी भाषेत किवींचा खेळाडू करु लागला कॉमेंट्री; हिंदी बोलण्यास दिला होता नकार

Ish Sodhi

Ish Sodhi

किवींच्या ( New Zealand) एका खेळाडूने आई मला ओरडेल असे सांगत हिंदी बोलण्यास नकार दिला होता. पण त्याचा पंजाबी भाषेतील कॉमेंट्री करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) नुकतचं पार पडलेल्या टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर (IND vs NZ) किवींच्या एका खेळाडूने आई मला ओरडेल असे सांगत हिंदी बोलण्यास नकार दिला होता. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्याने त्यामध्ये पंजाबी भाषेत कॉमेंट्री केली असल्याचे पाहायाला मिळत आहे.

न्यूझीलंडचा लेग स्पिनर ईश सोढीचा (Ish Sodhi) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याने ,”सत श्री अकाल जी, माझे नाव इंद्रबीर सिंग सोधी. मला वाटते आजकाल पंजाबीतही कॉमेंट्री व्हायला हवी. तर मी सुरुवात करणार आहे, माझ्यासोबत चला. गोलंदाज समोरून येत आहे, चेंडू आत येत आहे आणि हा शॉट खेळला आहे, अरे बॅटची कड लागली आहे. लाथ मारली, ख्रिस्तियानो रोनाल्डो”, अशी गंमतीशीर कॉमेंट्री केली असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

हिंदी बोलण्यात दिला होता नकार

टीम इंडियाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर, पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हिंदीत टेऊ शकतोस का असे विचारले. तेव्हा, 'माझी आईदेखील मला पाहत असेल आणि मी जरादेखील चुकीचं काही बोललो तर ती मला खूप ओरडेल. त्यामुळे यावेळी मी इंग्रजीत उत्तर देतो. पण माझं हिंदी सुधारेल'' अशी आशा व्यक्त केली होती.

कोण आहे स्पिनर ईश सोढी?

ईश सोढीचा जन्म 31 ऑक्टोबर 1992 रोजी लुधियाना, पंजाब, भारत येथे झाला. इंदरबीर सिंग सोधी असे त्याचे पूर्ण नाव आहे. सोढी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी कुटुंबासह न्यूझीलंडला आले होते. त्याचे कुटुंब न्यूझीलंडमधील दक्षिण ऑकलंड येथे स्थायिक झाले होते.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Icc, New zealand, Punjab, T20 league, T20 world cup