• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'एकटा पुजाराच समस्या होती का?' गावसकरांचा विराटवर निशाणा

'एकटा पुजाराच समस्या होती का?' गावसकरांचा विराटवर निशाणा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) पराभव केला, यानंतर चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) बॅटिंगवर टीका होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) पराभव केला, यानंतर चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) बॅटिंगवर टीका होत आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेतही विराट कोहलीने (Virat Kohli) चेतेश्वर पुजारावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. प्रत्येक वेळी आऊट व्हायच्या चिंतेने खेळता येणार नाही, थोडा धोका पत्करावाच लागेल, असं कोहली म्हणाला. कोहलीच्या या वक्तव्यामुले पुजाराचं टीममधलं स्थान धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मात्र यावरून विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये एकट्या पुजाराचीच समस्या होती का? असा सवाल गावसकरांनी विचारला आहे. फायनलमध्ये पुजाराने 15 आणि 8 रनची खेळी केली. या रन करताना पुजाराने बरेच बॉल खेळले, पण गावसकर यांनी मात्र पुजाराला पाठिंबा दिला आहे. 'भारताबद्दल सोडा, पण केन विलियमसन आणि रॉस टेलर कसे खेळले बघा. सुरुवातीला तेदेखील संथ खेळत होते. जर तुम्हाला कोणाकडे बोटं दाखवयाची असतील, तर आपण काहीही करू शकत नाही,' अशी प्रतिक्रिया सुनिल गावसकर यांनी दिली. 'पुजारा एका बाजूने मजबूत पद्धतीने उभा असतो, त्यामुळे दुसऱ्या बाजूच्या खेळाडूला मोठे शॉट मारता येतात. दुसरा खेळाडू धोका पत्करतो, तेव्हा त्याला पुजारा एक बाजू लावून धरेल असं वाटत असतं,' असं वक्तव्य गावसकर यांनी स्पोर्ट्स तकशी बोलताना केलं. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर विराटने नव्याने टीमची बांधणी करण्याचे संकेत दिले होते. 'पुढची रणनिती ठरवण्यासाठी आम्ही वर्षभर थांबणार नाही. मर्यादित ओव्हरच्या भारतीय टीमकडे बघितलं तर खेळाडू तयार आहेत आणि त्यांना आत्मविश्वासही आहे. योग्य मानसिकता असलेले खेळाडू जे अजिबात न घाबरता खेळतील, अशांना संधी दिली जाईल,' असं विराट म्हणाला होता. या पत्रकार परिषदेनंतर बीसीसीआयच्या सूत्रांनी टीममध्ये मोठे बदल होणार असल्याचं सांगितलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये विराट तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो तसंच चौथ्या क्रमांकावर केएल राहुल किंवा हनुमा विहारीला संधी दिली जाऊ शकते, ज्यामुळे पुजाराला बाहेर बसावं लागू शकतं, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं होतं.
  Published by:Shreyas
  First published: