मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

MS Dhoni: खरंच महेंद्रसिंग धोनीनं केली 'ही' मोठी चूक? तर 'त्या' एका निर्णयाचा होईल धोनी अँड कंपनीला पश्चाताप

MS Dhoni: खरंच महेंद्रसिंग धोनीनं केली 'ही' मोठी चूक? तर 'त्या' एका निर्णयाचा होईल धोनी अँड कंपनीला पश्चाताप

महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni: सध्या सुरु असलेल्या विजय हजारे वन डे करंडकात तामिळनाडूकडून खेळणाऱ्या जगदीशननं शतकांचा धडाका लावला आहे. पण सोमवारी अरुणाचल प्रदेशविरुद्ध जगदीशननं विक्रमी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 22 नोव्हेंबर: महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्स ही आयपीएलमधल्या सर्वात यशस्वी फ्रँचायझींमधली एक. चेन्नई सुपर किंग्सनं आतापर्यंत चार वेळा आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. या प्रत्येक विजयात टीमचा नायक महेंद्रसिंग धोनीचा अर्थातच सर्वात मोठा वाटा आहे. पण आगामी आयपीएलच्या दृष्टीनं चेन्नई सुपर किंग्सनं नुकताच घेतलेला एक निर्णय ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरु शकते. सीएसकेनं नुकतंच टीममधील काही खेळाडूंना रिटेन केलं आहे. तर काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. याच बाहेर गेलेल्या खेळाडूंमध्ये एक नाव आहे नारायण जगदीशन. याच जगदीशननं चेन्नईनं टीममधून बाहेर काढताच असं काही केलंय की ज्यामुळे त्याचा आगामी आयपीएल लिलावातला भाव चांगलाच वाढणार आहे. पण सीएसकेसाठी मात्र सध्या डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे.

विजय हजारे ट्रॉफीत जगदीशनचा धमाका

सध्या सुरु असलेल्या विजय हजारे वन डे करंडकात तामिळनाडूकडून खेळणाऱ्या जगदीशननं शतकांचा धडाका लावला आहे. पण सोमवारी अरुणाचल प्रदेशविरुद्ध जगदीशननं विक्रमी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अरुणाचलविरुद्ध तामिळनाडूनं लिस्ट ए क्रिकेटमधली सर्वाधिक धावसंख्या उभारली. (506/2) याच इनिंगमध्ये नारायण जगदीशननं विक्रमी 277 धावांची खेळी केली तिही 141 बॉलमध्ये. लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातली ही आजवरची सर्वाेच्च वैयक्तिक खेळी ठरली. याशिवाय यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीतलं सहा इनिंगमधलं जगदीशनचं हे पाचवं शतक ठरलं.

विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये जगदीशन

5,  वि. बिहार

114, वि. आंध्र प्रदेश

107, वि. छत्तीसगड

168, वि. गोवा

128, वि. हरियाणा

277, वि. अरुणाचल प्रदेश

सामने - 6, धावा - 799, सरासरी - 159, शतकं - 5

हेही वाचा - FIFA WC 2022: इराणच्या टीमचा राष्ट्रगीत गायनास नकार, फिफा वर्ल्ड कपच्या मैदानात पाहा नक्की काय घडलं?

धोनीचं टेन्शन वाढणार?

पण जगदीशनच्या याच खेळीमुळे धोनीसह  सीएसकेचं टेन्शन मात्र वाढणार आहे. कारण 2018 पासून गेले 5 सीझन जगदीशन सीएसके टीमचा भाग होता. पण विकेट कीपर बॅट्समन असल्यानं त्याला फार कमी संधी मिळाली. त्यानं आतापर्यंत केवळ 7 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यामुळे सीएसकेनं यंदा त्यावला रिटेन केलं नाही. पण रिलीज करताच जगदीशननं बॅटमधून चांगलच उत्तर दिलं आहे. आगामी आयपीएल लिलावात जगदीशन जर पुन्हा चेन्नईच्या गळाला लागला नाही तर मात्र सीएसकेला चांगलाच पश्चाताप करावा लागणार आहे. 23 डिसेंबरला होणाऱ्या लिलावात त्याला पुन्हा विकत घेण्याची संधी सीएसकेकडे आहे.

First published:

Tags: Csk, Ipl, MS Dhoni, Sports