Home /News /sport /

Tokyo Olympic मधून परतल्यावर स्टार खेळाडूवर जीवघेणा हल्ला, चेहऱ्याची सर्जरी होणार

Tokyo Olympic मधून परतल्यावर स्टार खेळाडूवर जीवघेणा हल्ला, चेहऱ्याची सर्जरी होणार

ऑलिम्पिकहून परतलेल्या खेळाडूला बेदम मारहाण

ऑलिम्पिकहून परतलेल्या खेळाडूला बेदम मारहाण

टोकयो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) संपल्यानंतर सगळे खेळाडू घरी परतले आहेत, यानंतर त्यांचं स्वागतही जल्लोषात करण्यात आलं. आयर्लंडचा स्टार तायक्वांडो खेळाडू जॅक वूली (Jack Woolley) याच्यावर ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) संपल्यानंतर सगळे खेळाडू घरी परतले आहेत, यानंतर त्यांचं स्वागतही जल्लोषात करण्यात आलं. तसंच त्यांचा ठिकठिकाणी सत्कारही करण्यात येत आहे, पण एका खेळाडूला टोकयोहून परतणं महागात पडलं आहे. आयर्लंडचा स्टार तायक्वांडो खेळाडू जॅक वूली (Jack Woolley) याच्यावर ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. जॅक वूली याच्यावरचा हल्ला इतका भयंकर होता, की त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. 14 ऑगस्टच्या रात्री डबलिनमध्ये एका अनोळखी व्यक्तीने जॅक वूलीची पिटाई केली. यात वूलीला अनेक ठिकाणी जखमा झाल्या आणि चेहऱ्यातूनही खूप रक्त येऊ लागलं. त्याच्या ओठाला मागे आणि पुढे टाकेही घालण्यात आले. द सनने दिलेल्या वृत्तानुसार चेहऱ्याच्या सर्जरीसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 'मला पुनरागमन करायचं आहे आणि नेहमीचं आयुष्य जगायचं आहे. एका अपघातामुळे माझं आयुष्य थांबावं, असं मला अजिबात वाटत नाही,' असं जॅक वूली म्हणाला. टोकयो ऑलिम्पिकमध्ये जॅक राऊंड 16 मध्ये पोहोचला. तिकडे लुकास गुजमानने त्याचा पराभव केला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Olympic

    पुढील बातम्या