मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Irfan Pathan Blessed Baby Boy: इरफान दुसऱ्यांदा बनला बाबा, शेअर केली गुड न्यूज

Irfan Pathan Blessed Baby Boy: इरफान दुसऱ्यांदा बनला बाबा, शेअर केली गुड न्यूज

Irfan Pathan Blessed Baby Boy

Irfan Pathan Blessed Baby Boy

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणच्या (Irfan Pathan) घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. इरफान बाबा(Irfan Pathan Blessed Baby Boy) बनला आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 29 डिसेंबर: भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणच्या (Irfan Pathan) घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. इरफान बाबा(Irfan Pathan Blessed Baby Boy) बनला आहे. त्याने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही गुड न्यूज(good news) दिली आहे.

इरफानला याआधी एक मुलगा आहे ज्याचे नाव इमरान खान आहे. इरफानला दुसऱ्यांदाही पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. त्याचे नाव त्याने सुलेमान असे ठेवले असल्याची माहिती फोटो शेअर करतेवेळेस कॅप्शनमध्ये दिली आहे.

इन्स्टाग्रामवर बाप लेकाचा फोटो शेअर करत आपल आनंद त्याने चाहत्यांसोबत व्यक्त केला आहे. त्याने, 'सफा आणि मी आमच्या बाळाचे सुलेमान खानचे स्वागत करतो. आई आणि बाळ सुखरूप आहेत.' असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

इरफानने 2016 मध्ये दुबईतील प्रसिद्ध व्यवसायिक मिर्जा फारूख बेग यांची मुलगी सफा बेग हिच्याशी लग्न केले होते. त्या दोघांचे लग्न अतिशय कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत 4 फेब्रुवारी 2016 मध्ये सौदी अरेबियातील पवित्र शहर असलेल्या मक्कामध्ये झाला होता. 19 डिसेंबरला 2016 त्यांनी पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर सफा यांनी आज त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे.

सफाचा जन्म 28 फेब्रुवारी 1994 मध्ये झाला आहे. ती इऱफानपेक्षा वयाने 10 वर्षांनी लहान आहे. इरफान आणि सफा पहिल्यांदा 20 डिसेंबर 2016 मध्ये आई-बाबा बनले होते. तेव्हा इमनरानचा जन्म झाला होता.

इरफान 2007 मध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकलेल्या संघाचा भाग होता. त्याने त्या स्पर्धेत शानदार गोलंदाजी केली होती. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात 16 धावा देत 3 विकेट मिळवल्या होत्या. यामुळेच त्याला प्लेअर ऑफ दी मॅच निवडण्यात आले होते. संपूर्ण स्पर्धेत त्याने 14.90 च्या सरासरीने 10 विकेट घेतल्या होत्या. इरफानने भारतासाठी 29 कसोटी, 120 वनडे आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण 301 विकेट घेतल्या आहेत.

First published:

Tags: Cricket, Cricket news