Home /News /sport /

इस्रायल-पॅलस्टाइन मुद्द्यावरून इरफान-कंगना सोशल मीडियावर भिडले

इस्रायल-पॅलस्टाइन मुद्द्यावरून इरफान-कंगना सोशल मीडियावर भिडले

इस्रायल आणि पॅलस्टाईनच्या (Israel Palstine) मुद्द्यावरून कंगना रणौत (Kangana Ranaut) इस्रायलचं समर्थन केलं आहे, पण यावरून भारतीय ऑलराऊंडर इरफान पठाणने (Irfan Pathan) कंगनाला सुनावलं.

    मुंबई,13 मे : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतचं (Kangana Ranaut) ट्विटर अकाऊंट काहीच दिवसांपूर्वी सस्पेंड करण्यात आलं, तरीही कंगना सोशल मीडियावरच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्म्सवर सक्रीय आहे आणि स्वत:चे विचार शेयर करत आहे, यासाठी ती इन्स्टाग्रामचा आधार घेत आहे. इस्रायल आणि पॅलस्टाईनच्या (Israel Palstine) मुद्द्यावरून कंगनाने इस्रायलचं समर्थन केलं आहे, पण यावरून भारतीय ऑलराऊंडर इरफान पठाणने (Irfan Pathan) कंगनाला सुनावलं. इरफान पठाणने सोशल मीडियावर मंगळवारी पॅलस्टाईनचं समर्थन केलं होतं. इरफानने कागिसो रबाडाचं एक ट्वीट रिट्वीट केलं होतं, यामध्ये त्याने #PrayforPalestine असं लिहिलं होतं. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक मेसेज शेयर केला. कंगनाने आमदार दिनेश चौधरी यांच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर टाकला. 'इरफान पठाणला दुसऱ्या देशाबद्दल एवढं प्रेम आहे, पण स्वत:च्या देशातल्या बंगालवर त्याने एकही ट्वीट केलं नाही,' असं भाजप आमदार दिनेश चौधरी म्हणाले होते. दिनेश चौधरींच्या याच ट्वीटचा स्क्रीनशॉट कंगनाने इन्स्टाग्रामवर शेयर केला. dinesh chaudhary tweet यानंतर इरफान पठाण याने या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली. 'माझी सगळी ट्वीट मानवता आणि देशवासियांसाठी असतात. देशाचं सर्वोच्च स्थानावर प्रतिनिधीत्व केलेल्या व्यक्तीचा दृष्टीकोन माझ्या ट्वीटमध्ये असतो. पण मला कंगना, जिचं अकाऊंट द्वेष पसरवल्यामुळे सस्पेंड केलं आहे आणि काही अशी लोकं ज्यांच्या पेड अकाऊंटवरून फक्त द्वेष पसरवला जातो, त्यांचं ऐकावं लागत आहे,' असं इरफान म्हणाला. वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे कंगनाचं ट्विटर अकाऊंट काहीच दिवसांपूर्वी सस्पेंड करण्यात आलं होतं, यानंतर तिने इन्स्टाग्राम वापरायला सुरुवात केली. कंगना सोशल मीडियावर आक्रमक आणि वादग्रस्त पोस्ट शेयर करते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Israel, Kangana ranaut

    पुढील बातम्या