भारताच्या इरफाननं जिंकलं 2020च्या ऑलिम्पिकचे तिकीट

भारताच्या इरफाननं जिंकलं 2020च्या ऑलिम्पिकचे तिकीट

गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर काढल्यानंतर आता इरफानच्या पदकाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

  • Share this:

जपान, दि. 17 : भारताच्या 29 वर्षीय इरफान कोलोथूम थोडी या स्पर्धकानं चालण्याच्या स्पर्धेत टोकियो-2020 ऑलिम्पिकचं तिकीट जिंकलं आहे. केरळच्या मलप्पुरम गावातील इरफाननं रविवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवलं आहे. जपान येथे सुरू असलेल्या आशियाई चालण्याच्या शर्यतीत इरफाननं 1 तास 20.57 सेकंदाची वेळ नोंदवली. विशेष म्हणजे इरफानला आशियाई स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

इरफाननं 20 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत 1:20.57 सेकंदाची वेळ नोंदवताना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित केला. आता, इरफान 27 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सहभागी होणार आहे. इरफानसह आशियाई स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून देविंदर आणि गणपती या भारतीय खेळाडूंनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता निश्चित केली. याआधी इरफानने 2012च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतही देशाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र गेल्यावर्षी इरफान एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला होता. राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान ‘no needle policy’ चे उल्लंघन केल्यामुळे त्याला स्पर्धेतून माघारी पाठवण्यात आले होते. मात्र आता टोकियो-2020 ऑलिम्पिकचे तिकीट इरफानला मिळाल्यानंतर या स्पर्धेत भारताला पदक मिळवण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Tags:
First Published: Mar 17, 2019 06:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading