Home /News /sport /

‘सामान कुठे आहे? माझ्या कॉलेजच्या नोट्स...आयर्लंड महिला क्रिकेटरचे आयसीसीकडे गाऱ्हाणं

‘सामान कुठे आहे? माझ्या कॉलेजच्या नोट्स...आयर्लंड महिला क्रिकेटरचे आयसीसीकडे गाऱ्हाणं

Gaby Lewis

Gaby Lewis

आयर्लंडची महिला क्रिकेटपटू गॅबी लेविस (Gaby Lewis )ही ओमान या परदेश दौऱ्यावर गेली होती.

    नवी दिल्ली, 14 डिसेंबर: ओमिक्रोन(omicron) या कोरोनाव्हायरसच्या(Corona virus) नवीन प्रकारामुळे महिला वर्ल्‍ड कप 2022 ची क्‍वालिफायर स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आयर्लंड संघ मायदेशी परतला होता, परंतु क्रिकेटपटूंचे सामान अद्याप आयर्लंडला पोहोचलेले नाही. आयर्लंडची महिला क्रिकेटपटी गॅबी लेविसने (Gaby Lewis) आपल्या सामानांची अपडेट मागितली. आपले सामान ओमानमध्येच राहिले असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. इतकेच नव्हे तर रडतानाचे इमोजीही ट्विटमध्ये पोस्ट केले आहेत. त्यामुळे, तिच्या या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटद्वारे ट्वीट करत आयसीसीला आपल्या सामानासंदर्भात काही अपडेट आहेत का नाही? याची विचारपूस केली आहे. ‘ओमानमध्ये माझे सामान राहिले आहे. या गोष्टीला १३ दिवस उलटून गेले आहेत. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, त्या सामानामध्ये माझ्या कॉलेजचे नोट्ससुद्धा होते.’ असे लिहित तिने पुढे रडतानाचे इमोजीही जोडले आहेत. तिची ही चिंताग्रस्त मागणी पाहून क्रिकेट चाहत्यांचे गॅबीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी तिच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत, आयसीसीला लवकरात लवकर तिचे सामान शोधण्याची मागणी केली आहे. 20 वर्षीय गॅबीने आयर्लंडकडून 22 एकदिवसीय आणि 48 टी-20 सामने खेळले आहेत. तिने 505 वनडे आणि 1000 टी-20 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्येही तिच्या नावावर शतक आहे. याशिवाय तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 3 विकेट्स घेतल्या आहेत. गॅबी ही आयर्लंड महिला क्रिकेट संघासोबत ओमान या परदेशाच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी चुकून ती तेथील विमानात तिचे सामना विसरली (Gaby Lewis Forget Her Luggage) आहे. त्या सामानामध्ये तिच्या काही महत्वपूर्ण गोष्टीही होत्या. या गोष्टीला जवळपास 13 दिवस उलटले आहेत. परंतु अद्याप तिच्या सामानसंदर्भात कसलीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या गॅबीने थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल अर्थात आयसीसी( ICC) कडे मदतीसाठी धाव घेतली आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    पुढील बातम्या