इराणी चषक : विदर्भाच्या पहिल्या डावात 425 धावा, अक्षय कर्णेवारचे शतक

इराणी चषक : विदर्भाच्या पहिल्या डावात 425 धावा, अक्षय कर्णेवारचे शतक

शेष भारताला पहिल्या डावात 330 धावांत गुंडाळून विदर्भाने 95 धावांची आघाडी मिळवली.

  • Share this:

नागपूर, 15 फेब्रुवारी : दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवल्यानंतर विदर्भाने इराणी चषकाच्या सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. शेष भारताने पहिल्या डावात 330 धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विदर्भाने 425 धावा करत 95 धावांची आघाडी मिळवली.

विदर्भाच्या अक्षय कर्णेवारच्या शतकी तर संजय रामास्वामी, अक्षय वाडकर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर शेष भारतावर पहिल्या डावात 95 धावांची आघाडी मिळवली. तिसऱ्या दिवशी अक्षय कर्णेवारने 102 धावा केल्या. अक्षय वाडकरने 73 धावा करत त्याल्या साथ दिली. विदर्भाच्या तळातील फलंदाजांनी डाव लांबवला.

शेष भारताच्या राहुल चहरने 4 गडी बाद केले. कृष्णप्पा गौथम, धर्मेंद्रसिंह जडजा आणि अंकित राजपूत यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. रणजी जिंकून इराणी चषकावरही विदर्भाचं नाव कोरण्यासाठी संघ चौथ्या दिवशी मैदानात उतरेल.

VIDEO : स्टायलिश बोल्ट, 7 वर्षाच्या ब्लेझचा वेग पाहून तुम्हीही चकित व्हाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2019 09:23 AM IST

ताज्या बातम्या