फुटबॉल चाहतीचं बलिदान व्यर्थ गेलं नाही! हादरलेल्या इराणनं अखेर बदलला इस्लामचा कायदा

फुटबॉल चाहतीचं बलिदान व्यर्थ गेलं नाही! हादरलेल्या इराणनं अखेर बदलला इस्लामचा कायदा

फक्त सामना पाहण्यासाठी एका चाहतीला आपला जीव गमवावा लागला. आता बदलला कायदा.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : खेळ म्हटला की त्यात चाहते आले. दरम्यान कोणत्याही देशासाठी खेळ हे महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण देश एकत्र येतो. मग त्यात जात, धर्म किंवा स्त्री-पुरुष अशी विभागणी कधीच होत नाही. खेळ कोणताही असो चाहता हा चाहता असतो. मात्र गेल्या वर्षी एका घटनेनं संपूर्ण जगाला हादरून सोडले. हे प्रकरण म्हणजे ‘द ब्लु गर्ल’.

इराणच्या सुंदर फुटबॉल चाहतीला मात्र एक सामना पाहण्यासाठी संघर्ष करावा लागला. इराणच्या या चाहतील एक सामना पाहण्यासाठी इस्लामच्या कायद्याशी दोन-हात करावे लागले. त्यासाठी तिला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. या फुटबॉल चाहतीच्य मृत्यूनंतर फक्त इराणचं नाही तर सारं जग हादरलं. यानंतर अखेर इस्लाम कायद्यात मोठे बदल करण्यात आले. त्याचे पहिला आणि सर्वात मोठे उदाहरण 10 ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे. फुटबॉल पाहण्यासाठी संघर्ष केलेल्या या तरुणीचे नाव आहे, सहर खोडयारी. वयाच्या 29व्या वर्षी फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी तिला आपले प्राण गमवावे लागले. मार्च 2019मध्ये सहरनं आझादी मैदानावर आपल्या आवडत्या संघाचा सामना पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र इस्लाम धर्म आणि कायद्यानुसार महिलांना मैदानावर जाऊन सामना पाहण्याला बंदी आहे. त्यामुळं सहरला ही संधी मिळाली नाही. पण सहर थांबली नाही. इस्लाम धर्माबाबत आणि नियमाबाबत माहिती असूनही तिनं सामना पाहण्याचा निर्धार केला. त्यासाठी सहर पुरुषांचे कपडे परिधान करून, निळ्या रंगाचा विग घालून मैदानात गेली.

सोशल मीडियामुळं गमवावा लागला जीव

मैदानावरील सुरक्षा रक्षकांना चकवा देत सहर मैदानावर पोहचली. सामना चालू असताना तिच्या केसांवरील निळा विग खाली पडला. पुरुषांच्या कपड्यांमध्ये सामना पाहत असलेल्या सहरचा फोटो सोशल मीडियावर बघता बघता व्हायरल झाला. सहरबाबत कळताच तिला सुरक्षा रक्षकांनी लगेचच मैदानाबाहेर काढले आणि तिला अटक करण्यात आली. तिच्यावर खटला दाखल करण्यात आला. दरम्यान कोर्टात सहरनं स्वत:ला पेटवून दिले. 90 टक्के भाजलेल्या सहरनं मृत्यूशी झुंज केली, मात्र अखेर तिचा मृत्यू झाला.

साऱ्या देशात पसरली संतापाची लाट

सहरच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली. इराणच्या महिलांनी या भेदभावाविरोधात आवाज उठवला. एवढेच नाही तर जगभरातील फुटबॉल क्लब आणि सेलिब्रिटींनी सहरच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त करत इस्लामच्या या कायद्याचा निषेध केला. सहरच्या बलिदानाची दखल फीफा (FIFA) ने ही घेतली. त्यांनी या कायद्यात बदल व्हावी अशी मागणी केली होती. जगभरातूल होणाऱ्या विरोधातनंतर अखेर इराणनं या नियम बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं महिलांना आता इराणमध्ये सामना पाहता येणार आहे.

10 ऑक्टोबरला पहिल्यांदाच घडणार इतिहास

सहरच्या मृत्यूनंतर सरकारनं कायदा हटवत महिलांवरची बंदी काढत मोठी घोषणा केली. या घोषणेत 10 ऑक्टोबरला तेहरानच्या आझादी स्टेडियमवर होणाऱ्या फुटबॉल सामन्यात महिलांना सामना पाहण्याची संधी देण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. त्यानुसार इतिहासात पहिल्यांदाच इराणमधील पहिला मैदानात जाऊन सामना पाहू शकणार आहेत.

VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं

Published by: Priyanka Gawde
First published: October 8, 2019, 9:47 AM IST
Tags: fifa

ताज्या बातम्या