IPL चा 'किंग' कोहलीच! 6000 रन्स काढणारा पहिला बॅट्समन; दुसऱ्या स्थानावर हा विस्फोटक फलंदाज

IPL चा 'किंग' कोहलीच! 6000 रन्स काढणारा पहिला बॅट्समन; दुसऱ्या स्थानावर हा विस्फोटक फलंदाज

IPL2021, RCB vs RR: विराट कोहलीने (Virat Kohli) काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध 72 रनांची नाबाद खेळी करत आयपीएलमध्ये सर्वाधिक 6 हजार धावांचा टप्पा (6000+ Runs) ओलांडला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 एप्रिल: भारतीय क्रिकेट कप्तान विराट कोहलीने (Virat Kohli) यापूर्वी क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आयपीएलच्या चालू हंगामात (IPL 2021) त्याने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध 72 रनांची नाबाद खेळी करत आयपीएलमध्ये सर्वाधिक 6 हजार धावांचा टप्पा (6000 Runs) ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव बॅट्समन ठरला आहे. तत्पूर्वी 6000 रनांचा टप्पा पार करण्यासाठी त्याला 51 धावांची गरज होती. त्याने आरसीबीकडून खेळताना राजस्थान रॉयल्सविरूद्ध (RCB vs RR) 72 रन्सची धमाकेदारी केळी करून आयपीएलमध्ये 6021 रन्स पूर्ण केल्या आहेत.

आयपीएलमधील विराट कोहलीचा हा 196 वा सामना होता. त्याने 38 च्या सरासरीने 6021 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 5 शतकांसह 40 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेट प्रकारात विराट कोहली सर्वाधिक 9874 धावा करणारा भारतीय बॅट्समन आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 9203 धावांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

आतापर्यंत तीन खेळाडूंनी 10 हजाराहून अधिक धावा केल्या

टी-20 चा विक्रम लक्षात घेता, आतापर्यंत जगातील फक्त तीन खेळाडूंनी 10 हजार किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.  यामध्ये वेस्ट इंडीजचा विस्फोटक बॅट्समन ख्रिस गेल अव्वल स्थानावर आहे. त्याने 13,796 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 22 शतकांसह 86 अर्धशतकं झळकावली आहेत. केरॉन पोलार्ड 10,678 धावांसह दुसर्‍या स्थानावर आहे. तर पाकिस्तानी बॅट्समन शोएब मलिकच्या खात्यात 10,488 धावा आहेत. डेव्हिड वॉर्नर दहा हजार धावांचा टप्पा ओलांडू शकतो. त्याच्या खात्यात 9954 धावा जमा असून त्याला फक्त 46 धावांची आवश्यकता आहे.

(हे वाचा-Vamika ठरतेय विराटसाठी Lucky! अर्धशतकानंतर लाडक्या लेकीची काढली आठवण, VIDEO)

चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना दुसऱ्या क्रमांकावर

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना (Suresh Raina) 5448 धावांसह दुसर्‍या क्रमांकांवर आहे. या व्यतिरिक्त शिखर धवन 5428 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली हा आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी खेळाडू असला तरी, त्याचा संघ बंगळुरूला आतापर्यंत एकदाही विजेतेपद पटकवता आलं नाही.

Published by: News18 Desk
First published: April 23, 2021, 12:34 PM IST

ताज्या बातम्या