07 एप्रिल : आयपीएलच्या दहाव्या हंगामाच्या तिसऱ्या मॅचमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने गुजरात लायन्सचा 10 विकेटने धुव्वा उडवला. कॅप्टन गौतम गंभीर 76 आणि ख्रिस लिनच्या नाबाद 93 रन्सच्या खेळीवर कोलकाताने शानदार विजय मिळवला.
गुजरातने पहिली बॅटिंग करत कोलकाताला 184 रन्सचं आव्हान दिलं होतं. कोलकाताने हे आव्हान अवघ्या 14.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. हा विजय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 10 विकेट घेतला गेलाय. ख्रिस लिनने अवघ्या 19 रन्समध्ये अर्धशतक पूर्ण केलं. लिननंच हे अर्धशतक आयपीएलमध्ये सर्वाधिक जलद अर्धशतक राहिलं.