आजपासून रंगणार आयपीएल 10चा थरार

आज आयपीएलचा सलामीचा सामना गतचॅम्पियन सनरायझर्स हैदराबाद आणि उपविजेता रॉयल चॅलेंजर्स यांच्यात होणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2017 10:43 AM IST

आजपासून रंगणार आयपीएल 10चा थरार

05 एप्रिल : आजपासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होतेय. आज सलामीचा सामना गतचॅम्पियन सनरायझर्स हैदराबाद आणि उपविजेता रॉयल चॅलेंजर्स यांच्यात होणार आहे.

या सामन्यात बंगळुरूचा नियमित कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली आपल्या खांद्याच्या दुखापतीमुळे खेळणार नाही. कोहलीच्या जागी ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन आरसीबीचा कर्णधार असेल.

दुसरीकडे हैदराबादचा कर्णधारसुद्धा ऑस्ट्रेलियन खेळाडू असून, या संघाची मदार डेव्हिड वॉर्नरवर आहे. हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर मागच्या वेळी विराट कोहलीनंतर सर्वाधिक ८४८ धावा काढणारा दुसरा फलंदाज होता. हैदराबादला या वेळीसुद्धा वॉर्नरकडून तशाच तुफानी प्रदर्शनाची आशा आहे.

सध्याच्या बेंगळूरूचा संघ पाहिला तर त्यामध्ये वॉटसन आणि गेल हेच सर्वात अनुभवी खेळाडू आहेत. भारतीय संघातून एकदिवसीय सामन्यांमध्ये चमक दाखवणारा केदार जाधव या हंगामात नेत्रदीपक कामगिरी करण्यासाठी सज्ज असेल. या हंगामात त्याला जास्त संधी मिळण्याची शक्यता असून या संधीचं तो सोने करतो का, हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

संभाव्य संघ

Loading...

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू : शेन वॉटसन (कर्णधार), विराट कोहली, सर्फराझ खान, सचिन बेबी, श्रीनाथ अरविंद, अवेश खान, स्टुअर्ट बिन्नी, युझवेंद्र चहल, अंकित चौधरी, इक्बाल अब्दुल्ला, केदार जाधव, मनदीप सिंग, पवन नेगी, हर्षल पटेल, टायमल मिल्स, तबरेझ शम्सी, अ‍ॅडम मिलने, ख्रिस गेल, ट्रॅव्हिस हेड, एबी डी’व्हिलियर्स, सॅम्युअल बद्री.

सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), तन्मय अगरवाल, रिकी भुई, बिपुल शर्मा, शिखर धवन, एकलव्य द्विवेदी, दीपक हुडा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, आशीष नेहरा, अभिमन्यू मिथुन, मोहम्मद सिराज, नमन ओझा, विजय शंकर, बरिंदर सरण, प्रवीण तांबे, युवराज सिंग, केन विल्यमसन, रशीद खान, मुस्ताफिझूर रहमान, मोहम्मद नबी, बेन लॉलिन, ख्रिस जॉर्डन, मॉइझेस हेन्रिक, बेन कटिंग.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 10:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...