IPL बाबत सौरव गांगुलीने केली मोठी घोषणा, कोरोनोच्या दहशतीचा असा होणार परिणाम

सौरव गांगुलीने आयपीएलसंदर्भात आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

सौरव गांगुलीने आयपीएलसंदर्भात आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 14 मार्च : कोरोनाव्हायरसच्या धोक्यामुळे आयपीएल दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आलेला आहे आहे. 29 मार्चपासून सुरू होणारी स्पर्धा आता 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आयपीएलसंदर्भात आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. 'आयपीएलमधील सामने कमी केले जातील. याआधीच आम्ही आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्याला काही सामने रद्द करावे लागतील. आता आम्ही किती सामने कमी करावे लागतील, हे पाहात आहोत,' अशी माहिती सौरव गांगुलीने दिली आहे. त्यामुळे आयपीएलच्या चाहत्यांची काही प्रमाणता निराशा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग आयोजित करण्यासाठी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची शनिवारी 14 मार्च रोजी बैठक होणार होती, ज्यामध्ये आठही मताधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पण त्याआधी बीसीसीआयने सुमारे दोन आठवड्यांसाठी लीगला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी दिल्ली सरकारनेही इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यांना बंदी घातली. हेही वाचा- टीम इंडियाने घेतला कोरोनाचा धस्का, मास्क घालून फिरतेय विराटसेना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुढील आदेश येईपर्यंत आयपीएलवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. त्याचवेळी कर्नाटक सरकारनेही आयपीएलचे आयोजन करण्यास माघार घेतली, तर महाराष्ट्र सरकारने तिकिटांच्या विक्रीवर बंदी घातली. आयपीएल सामने का कमी करण्यात येणार? आयपीएलचा तेरावा हंगाम याआधी 29 मार्च ते 24 मे असा 50 दिवसांसाठी आयोजित करण्यात आला होता. मात्र आता 15 एप्रिलपासून सामने सुरू झाल्यानंतर पुढे दिवस वाढवता येणार नाही. बीसीसीआयला 24 मेपर्यंत हा हंगामा संपवणे बंधनकारक आहे. कारण आयपीएलनंतर लगेचच भारताला आशिया चषक, विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा आहेत, त्यामुळे स्पर्धा जास्त काळ पुढे ढकलता येणार नाही. असा असेल गांगुलीचा प्लॅन सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या तेराव्या हंगामात एकूण 8 संघ आहेत. त्यामुळं 8 संघाचे 4 गट केले जाऊ शकतात. त्यानंतर या गटांमध्ये प्रत्येकी 6 सामने होतील. म्हणजे एकूण 24 गट सामने होतील. त्यानंतर 2 संघांमध्ये उपांत्य पूर्व, एक अंतिम सामना आणि एक सामना चौथ्या क्रमांकासाठी होईल. म्हणजे एकूण 28 सामने होतील, हे सामने 24 मेपर्यंत आयोजित केले जाऊ शकतात. त्याचबरोबर, खेळाडूंचे प्रवास थांबवण्यासाठी प्रत्येक संघाच्या होमग्राउंडवर सामने आयोजित केले जाणार नाहीत. तसेच, याआधी केवळ रविवारी दोन सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. आता सामने पुढे ढकलल्यामुळे शनिवारीही दोन सामन्यांचे आयोजन केले जाऊ शकते.
    First published: