मुंबई, 17 ऑगस्ट : इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2020) 29 मार्चपासून सुरू होणार होती. मात्र ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता कोरोनाचा तेरावा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. युएइमध्ये होणाऱ्या या हंगामासाठी सर्व खेळाडू आणि संघांनी आपला सराव सुरू केला आहे. यातच मुंबईचा कर्णधार रोहित शर्माही अॅक्शनमध्ये आला आहे. लॉकडाऊननंतर तब्बल 195 दिवसांनी रोहित शर्मा मैदानात उतरला आहे. यावेळी रोहित तुफान फलंदाजी करताना दिसला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झालेली एकदिवसीय मालिका रद्द झाल्यानंतर सर्व खेळाडू घरातच होते. त्यामुळे आता आयपीएलच्या निमित्तानं 195 दिवसांनी खेळाडू पुन्हा मैदानावर परतले आहे. मुंबई इंडियन्सचे खेळाडूही युएइ जाण्याआधी मुंबईत सराव करताना दिसत आहेत.
वाचा-स्पर्धेदरम्यान खेळाडूला कोरोना झाल्यास रद्द होणार IPL? असा आहे BCCIचा नियम
गतविजेत्या मुंबई संघाकडून यावेळीही चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. यातच रोहितचा फॉर्म संघासाठी महत्त्वाचा आहे. दरम्यान, अद्याप आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही आहे. मात्र त्याआधीच रोहितनं सरावास सुरुवात केली आहे.
195 days since we last saw Hitman in action. The wait is Ro-over 👊💙#OneFamily #IPL2020 @ImRo45 pic.twitter.com/Tn6pazes9L
— Mumbai Indians (@mipaltan) August 16, 2020
वाचा-युइएमध्ये मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड खराब! 2014मध्ये कोणत्या संघाचा होता दबदबा?
मुंबई इंडियन्सच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवरून रोहित शर्माच्या सरावाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामातील चॅम्पियन संघासाठी रोहित शर्मानं मोलाचं योगदानव दिलं होते. गेल्या हंगामात 15 सामन्यात रोहितनं 28.92च्या सरासरीनं 405 धावा केल्या होत्या. रोहितनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 188 सामने खेळले आहेत. यात त्यानं 31.60च्या सरासरीनं 4898 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहेत.
वाचा-यंदा IPL मध्ये मैदानात चिअर करताना दिसणार नाहीत खेळाडूंच्या 'या' सुंदर पत्नी!
असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, क्रुणाल पांड्या, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, राहुल चाहर, अनमोलप्रीत सिंह, जयंत यादव, आदित्य तारे, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, क्विंटन डिकॉक, केरोन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिशेल मॅकक्लाघेन, क्रिस लिन, सौरभ तिवारी, नाथन कूल्टर नाइल, मोसिन खान, दिग्विजय देशमुख.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai Indians, Rohit sharma