Home /News /sport /

BREAKING : IPL फायनलची तारीख बदलली, 'या' तारखेला रंगणार रोमांचक सामन्याचा थरार

BREAKING : IPL फायनलची तारीख बदलली, 'या' तारखेला रंगणार रोमांचक सामन्याचा थरार

अद्याप आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही आहे. मात्र आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता युएइमध्येही या 5 फलंदाज दबदबा असणार आहे.

अद्याप आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही आहे. मात्र आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता युएइमध्येही या 5 फलंदाज दबदबा असणार आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील लोकप्रिय क्रिकेट लीग अर्थात IPL चा यंदाचा सीझन लांबणीवर पडला.

    मुंबई, 2 ऑगस्ट : जगभरात पसरत असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील लोकप्रिय क्रिकेट लीग अर्थात IPL चा यंदाचा सीझन लांबणीवर पडला. मात्र आता आयपीएलच्या तारखांची अधिकृत माहिती देण्यात आली असून आयपीएलचा यंदाचा सीझन 19 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 10 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेलली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) ही स्पर्धा यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली. मात्र भारतातील कोरोनाचे संकट आता आणखीनच गडद झाले असल्याने IPL होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र आता यंदा ही स्पर्धा होणार असल्याचं निश्चित झालं आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनीही याबाबतची माहिती दिली होती. '19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्याबाबत आमची चर्चा झाली. या स्पर्धेत सामील होणाऱ्या संघांनाही आम्ही याची माहिती दिली आहे,' असं ब्रिजेश पटेल यांनी म्हटलं होतं. मात्र ताज्या माहितीनुसार आयपीएलचा अंतिम सामना 8 नव्हे तर 10 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. दरम्यान, कोरोनामुळे भारतात ही स्पर्धा होणार नसल्याचं याआधीच स्पष्ट झाले होतं. ही स्पर्धा युएईमध्ये होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं आहे. यादरम्यान 60 सामने होणार असल्याचे सांगितले जात आहे. किती वाजता सुरू होणार आयपीएलचे सामने? आयपीएल 2020चे सर्व सामने सायंकाळी 7.30 वाजता सुरू केले जाऊ शकतात. भारतीय वेळेनुसार हे सामने 8 वाजता सुरू होतील, तर 7.30 वाजता टॉस होईल. याआधी काही सामने दुपारी 4 वाजताही आयोजित करण्यात येत होते, मात्र यंदा युएईमध्ये ही स्पर्धा होत असल्याचे सर्व सामने 8 वाजताच खेऴवले जातील.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या