IPL 2020 : IPLचे संघ जाणार अमेरिका दौऱ्यावर, मुंबई इंडियन्सचा अफलातून प्रस्ताव

IPL 2020 : IPLचे संघ जाणार अमेरिका दौऱ्यावर, मुंबई इंडियन्सचा अफलातून प्रस्ताव

IPLचा तेरावा हंगाम होणार ग्लोबल. होणार मोठे बदल.

  • Share this:

मुंबई, 05 नोव्हेंबर : बीसीसीआयच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या इंडियन प्रिमीअर लीगची (IPL) प्रसिध्दी कोणापासून लपून राहिलेली नाही. आयपीएलचा प्रत्येक हंगाम एक नवीन विक्रम प्रस्थापित करत असतो. आयपीएल 2020ला महिन्यांचा कालावधी उरला असताना डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे. मात्र त्याआधी आयपीएलमध्ये मोठे बदल केले जाणार आहे.

बीसीसीआयच्या वतीनं आयपीएलच्या येत्या 13वा हंगामात क्रांतिकारी बदल केले जाणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुढच्या हंगामात पॉवर प्लेयरचा वापरही करण्यात येणार आहे. आता दुसरी मोठी बातमी म्हणजे आयपीएलच्याआधी सर्व संघ विदेशी भुमीवर एकमेकांविरोधात सराव सामना खेळू शकतात.

विदेशात सराव सामने खेळणार आयपीएलचे संघ

मीडिया रिपोर्ट्सनुसार मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांनी बीसीसीआयला आयपीएलआधी सराव सामने खेळण्याची परवानगी मागितली आहे. यामुळं आयपीएलचा जगभरात विस्तारही होईल. त्याचबरोबर खेळाडू मुख्य स्पर्धेआधी सराव सामनेही खेळती. दरम्यान बीसीसीआयचे काही अधिकारी आयपीएलच्या मुख्य समितीसोबत याबाबत विस्तृतमध्ये चर्चा करतील.

वाचा-गांगुलीचा आणखी एक धमाका, IPLमध्ये येणार टशन वाढवणारा नवा नियम!

मुंबई इंडियन्सनं मांडला प्रस्ताव

परदेशात मैत्रीपूर्ण सामने खेळण्याचा प्रस्ताव मुंबई इंडियन्स संघानं दिला. मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनानं अमेरिकेत हे सामने खेळण्याचा प्रस्ताव मांडला आहे. च्यामुळं आयपीएलचे प्रमोशन तसेच सरावही होईल. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे भारत-वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 सामना झाला होता. त्यामुळं आयपीएलमध्ये सराव सामने खेळून अमेरिकेतही क्रिकेटचा प्रसार केला जाऊ शकते.

वाचा-माही इज बॅक! ऐतिहासिक कसोटी सामन्यात दिसणार धोनीची झलक

आयपीएलमध्ये येणार पॉवर प्लेयर नियम

बीसीसीआयच्या वतीनं आयपीएलमध्ये आता पॉवर प्लेअर हा नियम लागू करण्यात येऊ शकतो. या नियमामुळं प्रत्येक संघात 15 खेळाडूंची निवड होऊ शकते. त्यामुळं 11 खेळाडू मैदानावर असतील आणि 4 खेळाडू प्लेयिंग इलेव्हनमध्येच असतील पण संघात त्यांना गरज पडेल तसे, घेण्यात येईल.याआधी फक्त क्षेत्ररक्षण करण्यासाठी फक्त इतर खेळाडू उतरत होते, आता हे चार खेळाडू बदली खेळाडू म्हणून फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी उतरतील. दरम्यान, मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हा नियम लागू करण्यात येणार आहे.

वाचा-राजकारण्यांनी वाऱ्यावर सोडलेल्या शेतकऱ्यांसाठी मराठमोळ्या क्रिकेटपटूचा पुढाकार

असा आहे नियम

हा नियम सर्व संघाबरोबर चाहत्यांसाठीही रोमांचक असणार आहे. कारण बॅंचवर बसणारे खेळाडूही सामना खेळू शकतात. एकटा खेळाडू संघाचे रुपडे बदलू शकतात. जर शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावा हव्या असतील तर संघातील खेळाडू फिट नसतील तर आक्रमक खेळाडू मैदानात उतरतील. त्यामुळं सामन्याचे रुप बदलू शकते. त्यामुळं अकरा खेळाडूंच्या संघात आक्रमक खेळाडू नसतील आणि बाहेर बसलेल्या 4 खेळाडूंमध्ये आक्रमक असतील तर त्यापैकी एका खेळाडूला संधी मिळू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2019 03:35 PM IST

ताज्या बातम्या