स्पोर्ट्स

  • associate partner

Mumbai Indians vs CSK: अविश्वसनीय! फाफ ड्यू प्लेसिसनं घेतला जबरदस्त कॅच, बघत बसला हार्दिक पांड्या; पाहा VIDEO

Mumbai Indians vs CSK: अविश्वसनीय! फाफ ड्यू प्लेसिसनं घेतला जबरदस्त कॅच, बघत बसला हार्दिक पांड्या; पाहा VIDEO

आयपीएलच्या (IPL 2020): पहिलाच सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai SuperKings) यांच्यात होत आहे.

  • Share this:

अबू धाबी, 19 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाची सुरुवात दणक्यात झाली मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सामन्यात धोनीनं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत मुंबईच्या फलंदाजांना हैराण केले. मुंबईकडून रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरुवात केली. मात्र चौथ्या ओव्हरमध्ये पियूष चावलानं ही जोडी फोडली.  मात्र सगळ्यांचे लक्ष वेधले ते फाफ ड्यू प्लेसिसनं. रविंद्र जडेजाच्या 14व्या ओव्हरमध्ये फाफनं दोन जबदरदस्त कॅच घेतले. 14व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर फाफनं सीमारेषेवर कॅच घेत सौरभ तिवारीला माघारी धाडले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर हार्दिक पांड्याचा झेल घेतला.

हार्दिक पांड्यानं सामन्याची आक्रमक सुरुवात केली. मैदानात येताच त्यानं षटकार मारला, मात्र रविंद्र जडेजाच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या नादात पांड्या बाद झाला. फाफनं सीमारेषेवर एका हातानं हार्दिकचा कॅच घेत, मुंबई इंडियन्सला मोठा झटका दिला. फाफनं हवेत उडी मारत अगदी सीमाऱेषेजवळ हार्दिकचा कॅच घेत, त्याला 14 धावांवर बाद केले.

दरम्यान, सामन्याच्या सुरुवातीलाच 48 धावांवर मुंबईचे दोन्ही सलामीवीर बाद झाले होते. रोहित बाद झाल्यानंतर लगेचच मुंबई इंडियन्सला दुसरा झटका बसला. पाचव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर क्विंटन डी कॉक बाद झाला. सॅम कुरननं क्विंटन डी कॉकला बाद केले. क्विंटननं 5 चौकार मारत 20 चेंडूत 33 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादव आणि सौरभ तिवारीनं चांगली सुरुवात केली. मात्र सूर्यकुमार यादव 17 धावांवर बाद झाला. राहुल चाहरनं सूर्यकुमार यादवला बाद केले.

त्यानंतर फलंदाजीस आलेल्या हार्दिक पांड्यानं दणक्यात सुरुवात केली. फलंदाजीला उतरताच हार्दिक पांड्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारला. सौरभ तिवारी आणि हार्दिक पांड्या चांगली फलंदाजी करणार असे वाटत असतानाच फाफनं जबरदस्त कॅच घेत दोघांना माघारी धाडले.

First published: September 19, 2020, 9:22 PM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading