दुबई, 27 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2021) हंगामात एकापाठोपाठ सामने पराभूत झालेल्या हैदराबाद सनरायझर्स (Sunrisers Hyderabad)संघाला सरत शेवटी गोड केला आहे. हैदराबादच्या संघाने सात गडी राखून राज्यस्थान रॉयलवर (Rajasthan Royals) दणदणीत विजय मिळवला आहे. जेसन रॉय (Jason Roy) आणि केन विल्यमसनच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या बळावर हैदराबादने 167 करत सामना खिश्यात घातला.
राजस्थान रॉयलने पहिली बॅटिंग करत दमदार 165 रन्सचा डोंगर उभा केला होता. संजू सॅम्सनने सर्वाधिक 82 रन्स केले. 57 बॉलमध्ये ३ सिक्स आणि 7 चौकार लगावत संजूने हैदराबादचा स्कोअर उंचावला. तर यश जयस्वालने 36 रन्सची चांगली इनिंग पेश केली. तर दुसरीकडे महिपाल लोमरनेही 29 रन्सची नाबाद खेळी केली.
हुश्श! सहा महिन्यांत पहिल्यांदा कोरोना ACTIVE CASES 3 लाखांच्या खाली
अत्यंत चुरशीच्या या सामन्यात हैदराबाद सनरायझर्सच्या बॉलरने विकेट काढून दबाव आणण्याचा आटोकात प्रयत्न केला. पण, यात त्यांना पुरेसे यश आले नाही.सिद्धार्थ कौलने दमदार एंट्री करत 2 विकेट मिळवल्या. तर संदीप शर्मा, भुवनेश्वर कुमार, राशीद खानने प्रत्येकी एक विकेट मिळवल्या.
भारीच! फक्त कोबी, ब्रोकोली काढण्यासाठी 63 लाख पगार; कंपनीने ऑफर केला ड्रिम जॉब
त्यानंतर 166 धावांचं आव्हान घेऊन हैदराबादचा संघ मैदानात उतरला. पण, यावेळी सलामीची जोडी बदलण्यात आली होती. खराब फॉर्ममध्ये असलेल्या डेव्हिड वॉर्नरला डिच्चू देण्यात आला होता. त्याच्या जागी जेसन रॉय आणि वृद्धमान साहा यांनी सुरुवात केली. जेसन रॉयने संधीचं पूर्ण फायदा घेत धडाकेबाज सुरूवात केली. 42 बॉलमध्ये त्याने १ सिक्स आणि ८ चौकार लगावत ६० धावांची खेळी केली. पण, साहा 18 धावा करून बाद झाला. त्यानंतर केन विल्यम्सनने संयमी खेळी करत टीमला विजय मिळवून दिला. विल्यम्सनने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर अभिषेक शर्माने 21 धावांची खेळी केली. 18.3 ओव्हरमध्ये ७ विकेट राखून हैदराबादने 167 रन्स करत सामना अखेर विजय मिळवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021