S M L

IPL Spot fixing Case : श्रीसंतला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, आजीवन बंदी हटवली

आयपीएल 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंत दोषी आढळला होता.

Updated On: Mar 15, 2019 11:40 AM IST

IPL Spot fixing Case :  श्रीसंतला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, आजीवन बंदी हटवली

नवी दिल्ली, 15 मार्च : क्रिकेटपटू एस श्रीसंतला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला असून त्याच्यावरची आजीवन बंदी हटवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, बीसीसीआयला यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे. आता बीसीसीआयने श्रीसंतला सुनावणी बाबत आणि तीन महिन्यात शिक्षा ठरवावी असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

बीसीसीआयने श्रीसंतवरील बंदीचा पुनर्विचार करावा असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तसेच श्रीसंतची बाजू समजून घ्यावी. त्याच्यावर आजीवन बंदी घालणे ही शिक्षा जास्त होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

न्यायाधीश अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचने बीसीसीआयला सांगितले की, तीन महिन्यात श्रीसंतच्या शिक्षेचा निर्णय घ्या. त्याच्यावरील बंदी हटवल्यानंतर काय शिक्षा देणार हे बीसीसीआयला सांगावे लागणार आहे.Loading...
आयपीएल 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंत दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. याविरोधात श्रीसंतने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याआधी बीसीसीआयने न्यायालयात श्रीसंतवर भ्रष्टाचार, सट्टेबाजी आणि खेळाला बदनाम केल्याचा आरोप केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 11:07 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close