आयपीएल सामने व्यावसायिक कार्यक्रम की क्रीडाप्रकार? - हायकोर्ट

आयपीएल सामने व्यावसायिक कार्यक्रम की क्रीडाप्रकार? - हायकोर्ट

नेमकी भूमिका स्पष्ट करण्यास बीसीसीआयला कोर्टानं सांगितले आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, 30 जून : आयपीएल सामने हा व्यावसायिक कार्यक्रम आहे की निव्वळ क्रीडाप्रकार आहे हे स्पष्ट करा, बीसीसीआयला मुंबई हायकोर्टाने आदेश दिला आहे. भविष्यात पुन्हा दुष्काळाची परिस्थिती आली तर मुंबई महापालिकेकडून पाणी घेणार नाही अशी बीसीसीआय आणि एमसीनं ग्वाही दिली आहे.

आयपीएल हा व्यावसायिक कार्यक्रम अाहे की निव्वळ खेळ आहे अशी विचारणा कोर्टाने केली, त्यावेळेस एमसीएनं क्रिकेटच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा, टेस्ट मॅचेस निव्वळ खेळ प्रकार आहे असं सांगितलं. तसंच आयपीएल अायोजकांकडून मनोरंजन करही राज्य सरकारला मिळत असतो त्यामुळे  त्याला निव्वळ खेळप्रकार म्हणता येणार नाही अशी माहिती कोर्टाला देण्यात आली. त्यामुळे याबद्दल नेमकी भूमिका स्पष्ट करण्यास बीसीसीआयला कोर्टानं सांगितले आहे.

मुंबई हायकोर्टानं ज्या ठिकाणी आयपीएल सामने होतात तिथल्या महापालिकांना भविष्यात दुष्काळ आल्यास त्यावेळेस आपली भूमिका काय असणार हे स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता १४ आॅगस्टला होणार आहे. गेल्या वर्षी राज्यात पाण्याच्या दुर्भिक्ष्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएल मॅचेस संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

First published: June 30, 2017, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading