News18 Lokmat

'या' आजींमुळेच जिंकली मुंबई इंडियन्स?

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 22, 2017 01:55 PM IST

'या' आजींमुळेच जिंकली मुंबई इंडियन्स?

22 मे : आयपीएलच्या 10 सीझनच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं अतिशय थरारक विजय मिळवत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. पण या आजीच मुंबईच्या विजयामागचं खरं कारण आहेत. आहो, असं आम्ही म्हणत नाही आहोत, सोशल मीडियावरचं अशा चर्चा  रंगलेल्या आहेत.

मुंबई इंडियन्सनं प्रथम फलंदाजी करताना पुण्यासमोर अवघ्या 130 धावांचं आव्हान ठेवलं होतं. शेवटच्या ओव्हरपर्यंत मुंबई इंडियन्सच्या हातातून मॅच जातीये की काय, अशी धाकधूक मुंबईकरांना लागली होती. पण ऐन रंगात आलेल्या मॅचमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते या आजीबाईंनी... शेवटी या आजींचीच पार्थना मुंबई इंडियन्सच्या कामी आल्या आणि संपूर्ण मॅच फिरली.

मुंबई इंडियन्सनं अगदी शेवटच्या क्षणी पुण्याचा विजयाचा घास हिसकावून घेतला. पुण्याच्या बाजूने झुकलेला हा सामना, आजीबाईंना देवाचा धावा करताना दाखवल्यानंतर अचानक त्याच ओव्हरमध्ये मुंबईच्या बाजूनं झुकलं आणि पहाता पहाता मुंबईने हा सामना जिंकला.

Loading...

रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर अवघ्या एका धावेने विजय मिळवत मुंबईने तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावलं. मग काय सहाजिकच मॅच संपल्यानंतर सगळीकडे या आजीबाईंची चर्चा सुरू झाली आहे. आता या आजी कोण आहेत? त्या कुठे राहतात? या शोध आता माध्यमांनी घ्यायला सुरूवात केली खरी, पण या आजी काही सापडे ना...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2017 01:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...