मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 Retention : SRH साठी इरफान पठाणची बॅटिंग, वॉर्नरवर साधला निशाणा

IPL 2022 Retention : SRH साठी इरफान पठाणची बॅटिंग, वॉर्नरवर साधला निशाणा

David Warner

David Warner

आयपीएल 2022 साठी (IPL Retention 2022) सगळ्या 8 टीमनी रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. या टीमनी एकूण 27 खेळाडू रिटेन केले आहेत, पण यानंतर सनरायजर्स हैदराबादवर (SRH) मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे.

मुंबई, 3 डिसेंबर : आयपीएल 2022 साठी (IPL Retention 2022) सगळ्या 8 टीमनी रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. या टीमनी एकूण 27 खेळाडू रिटेन केले आहेत, पण यानंतर सनरायजर्स हैदराबादवर (SRH) मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. हैदराबादने आयपीएल 2022 (IPL 2022) साठी तीन खेळाडू रिटेन केले, यामध्ये केन विलियमसन (Kane Williamson), अब्दुल समद (Abdul Samad) आणि उमरान मलिक (Umran Malik) यांचा समावेश आहे. समद आणि मलिक हे दोघं अनकॅप खेळाडू आहेत. अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना रिटेन न केल्यामुळे हैदराबादच्या चाहत्यांनी फ्रॅन्चायजीवर निशाणा साधला आहे. टीमने डेविड वॉर्नर (David Warner) आणि राशिद खान (Rashid Khan) यांना सोडण्याचा निर्णय घेतला.

डेविड वॉर्नर आणि राशिद खान हे दोन्ही खेळाडू मागची अनेक वर्ष क्रिकेटचा सगळ्यात छोटा फॉरमॅट गाजवत आहेत. वॉर्नरसोबत तर या मोसमाच्या सुरुवातीपासूनच वाद सुरू झाले. आयपीएलच्या पहिल्या राऊंडवेळी वॉर्नरला कर्णधारपदावरून काढण्यात आलं, यानंतर त्याला दुसऱ्या राऊंडमध्ये प्लेयिंग-11 मधूनही बाहेर करण्यात आलं.

डेविड वॉर्नरला हैदराबादच्या टीमने दिलेल्या या वागणुकीमुळे अनेकजण नाराज होते, पण या वादामध्ये भारताचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण (Irfan Pathan) याने हैदराबादच्या टीमचा बचाव केला आहे. पठाणने अप्रत्यक्षरित्या वॉर्नरवरही निशाणा साधला आहे. 'लोक एका परदेशी खेळाडूबाबत फ्रॅन्चायजीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहेत. पण त्यांनी हेदेखील लक्षात ठेवावं की, फ्रॅन्चायजीने या खेळाडूचं तेव्हा समर्थन केलं, जेव्हा त्याच्या देशाने त्याच्या खेळण्यावर बंदी घातली होती,' असं पठाण म्हणाला.

इरफान पठाणने 2018 साली झालेल्या सॅण्ड पेपर वादावरून वॉर्नरवर निशाणा साधला. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टेस्टवेळी वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ दोषी आढळले, यानंतर त्यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली. याशिवाय युवा खेळाडू कॅमरून बॅन्क्रॉफ्ट याच्यावरही 9 महिन्यांची बंदी घालण्यात आली. या कारणामुळे वॉर्नर 2018 सालची आयपीएल खेळू शकला नाही, पण 2019 साली त्याने हैदराबादच्या टीममध्ये पुनरागमन केलं आणि 2020 आधी तो पुन्हा कर्णधार झाला.

2014 पासून वॉर्नर हैदराबादच्या टीमसोबत आहे. हैदराबादने वॉर्नरच्याच नेतृत्वात 2016 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली. हैदराबादच्या टीममध्ये आल्यानंतर वॉर्नरने प्रत्येक वर्षी 500 पेक्षा जास्त रन केले. त्याने सर्वाधिक तीन वेळा ऑरेंज कॅपही जिंकली, या मोसमात मात्र त्याला 500 रनचा टप्पा ओलांडता आला नाही.

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction