मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : मुंबई टेस्टमधलं स्थान धोक्यात, रहाणेला रात्री बसणार आणखी एक धक्का

IND vs NZ : मुंबई टेस्टमधलं स्थान धोक्यात, रहाणेला रात्री बसणार आणखी एक धक्का

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली दुसरी टेस्ट (India vs New Zealand 2nd Test) 3 डिसेंबरपासून मुंबईमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमधून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टीममध्ये पुनरागमन करणार आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली दुसरी टेस्ट (India vs New Zealand 2nd Test) 3 डिसेंबरपासून मुंबईमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमधून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टीममध्ये पुनरागमन करणार आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये आणि कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये खेळला नव्हता. विराट कोहलीच्या पुनरागमनानंतर टीममधून कोणाला डच्चू देण्यात येणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पहिल्या टेस्टमधून श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टेस्ट टीममध्ये पदार्पण केलं. या सामन्यात अय्यरने शतक आणि अर्धशतक केलं. असा विक्रम करणारा तो पहिलाच भारतीय ठरला.

श्रेयस अय्यरच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याने टीममधलं स्वत:चं स्थान निश्चित केलं आहे, त्यामुळे दुसऱ्या टेस्टमधून अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे अजिंक्य रहाणेचं टेस्ट टीममधलं स्थान धोक्यात आलेलं असतानाच अजिंक्य रहाणेला आज रात्री आणखी एक धक्का बसणार आहे.

आयपीएल 2022 साठीच्या रिटेन (IPL Retention 2022) केलेल्या खेळाडूंची यादी आज रात्री जाहीर होणार आहे. अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो, पण दिल्लीची टीम रहाणेला रिटेन करणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि एनरिच नॉर्किया या 4 खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता आहे.

अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये सुरुवातीला राजस्थान रॉयल्सकडून खेळला, यानंतर जेव्हा राजस्थानवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली तेव्हा रहाणे पुण्याच्या टीममध्ये होता. राजस्थानच्या टीमचं आयपीएलमध्ये पुनरागमन झालं तेव्हा राजस्थानने पुन्हा एकदा रहाणेवर विश्वास दाखवत त्याला कर्णधार केलं, पण अचानक रहाणेची कॅप्टन्सी काढून घेऊन स्टीव्ह स्मिथला कॅप्टन करण्यात आलं. आयपीएल 2020 च्या मोसमात राजस्थानने रहाणेला दिल्लीकडे ट्रान्सफर केलं. आता दिल्लीनेही रिलीज केल्यामुळे रहाणेवर आयपीएल लिलावामध्ये बोली लागेल.

First published:

Tags: Ajinkya rahane, Ipl 2022