मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 Retention Live Streaming: जाणून घ्या, कधी, कुठे आणि कसं पाहता येणार?

IPL 2022 Retention Live Streaming: जाणून घ्या, कधी, कुठे आणि कसं पाहता येणार?

आयपीएलचा(IPL2022) 15 हंगाम क्रिकेटरसिंकासाठी पर्वणी ठरणार आहे. कारण या हंगामात 8 ऐवजी 10 टीम सहभागी होणार आहेत.

आयपीएलचा(IPL2022) 15 हंगाम क्रिकेटरसिंकासाठी पर्वणी ठरणार आहे. कारण या हंगामात 8 ऐवजी 10 टीम सहभागी होणार आहेत.

आयपीएलचा(IPL2022) 15 हंगाम क्रिकेटरसिंकासाठी पर्वणी ठरणार आहे. कारण या हंगामात 8 ऐवजी 10 टीम सहभागी होणार आहेत.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: आयपीएल 2022 (IPL 2022 Retention) साठी आजचा दिवस मोठा आहे. टी-20 लीगचे 8 जुने संघ कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करतील. हे संघ त्यांच्यासोबत 4 खेळाडूंना रिटेन करु शकणार आहेत. फ्रँचायझींना रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे दुपारी १२ वाजेपर्यंत बीसीसीआयकडे पाठवावी लागतील.

आयपीयल 15 व्या हंगामाचे IPL 2022 मेगा लिलावाचे वेळापत्रक कायम ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ठरवले जाईल. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रँचायझी देखील आयपीएल 2022 मध्ये पदार्पण करतील आणि रिलीज खेळाडूंना पूलमध्ये ठेवल्यानंतर, दोन्ही नवीन फ्रँचायझींना लिलावापूर्वी 3 खेळाडू निवडण्याची संधी दिली जाईल.

तसेच, अशी माहिती मिळाली आहे की, आयपीएल (IPL 2022 Mega Auction) पूर्वीचा लिलाव हा शेवटचा मेगा लिलाव असू शकतो. या वर्षानंतर, सर्व आयपीएल फ्रँचायझींनी स्वतःची इकोसिस्टम तयार करावी लागणार.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेन्नई सुपर किंग्ज एमएस धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मुंबई इंडियन्स रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह, कोलकाता नाइट रायडर्स सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश शर्मा. अय्यर, सनरायझर्स हैदराबाद केन विल्यमसन, दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, एनरिच नोर्किया आणि राजस्थान रॉयल्स संजू सॅमसन यांना कायम ठेवण्याचा विचार करत आहेत.

IPL 2022 रिटेंशन कधी सुरू होईल?

आयपीएल रिटेंशन भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरू होईल.

IPL 2022 Retention चे थेट प्रक्षेपण कुठे बघायचे?

आयपीएल रिटेंशनचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

IPL 2022 Retention चे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?

तुम्ही हॉटस्टारवर IPL 2022 Retention चे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. यासोबतच, तुम्ही आमच्या वेबसाइट https://hindi.news18.com/cricket/ लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करू शकता.

आयपीएलच्या 15 व्या हंगामात 10 टीम

आयपीएलच्या 15 व्या एडिशनमध्ये 10 टीम सहभागी होणार आहेत. त्यासाठी खेळाडूंचं ऑक्शन होण्यापूर्वी रिटेंशनची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. ही प्रक्रिया मंगळवारी म्हणजेच आज पूर्ण होईल. आयपीएलमधी जुन्या आठ टीम्सना त्यांच्याकडील चार खेळाडू रिटेन करता येणार आहेत. यामध्ये प्रत्येक टीम 2 ते 3 परदेशी खेळाडू रिटेन करु शकते. ही मुदत आज संपणार आहे.

First published:

Tags: Ipl, Ipl 2022, Ipl 2022 auction