IPLचे रिपोर्टकार्ड, पहिल्या पराभवासह चेन्नईनं गमावले अव्वल स्थान

IPLचे रिपोर्टकार्ड, पहिल्या पराभवासह चेन्नईनं गमावले अव्वल स्थान

एकीकडं सगळ्या संघानी आपली खाती उघडली असताना, अद्याप रॉयल चॅलेजर्स बंगळुरू संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही.

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल : आयपीएलच्या 12व्या हंगामाला सुरूवात होऊन आता बराच कालावधी लोटला आहे. त्यामुळं आता दिवसेंदिवस आयपीएलच्या या हंगामाचे ज्वर वाढताना दिसत आहे. दरम्यान आतापर्यंतच अनेक विक्रम मोडले गेले तर, अनेक वादांना तोंडही फुटले. एकीकडं सगळ्या संघानी आपली खाती उघडली असताना, अद्याप रॉयल चॅलेजर्स बंगळुरू संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. सध्या अकंतालिकेत सलामीचे फलंदाज आणि फॉर्मात असलेले गोलंदाज यांच्या जोरावर सनरायर्जस हैदराबादचा संघ अव्वल स्थानावर आहे. तर, 4 पैकी 3 सामने जिंकत पंजाबचा संघ 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईनं चेन्नईचा विजयरथ रोखल्यामुळं धोनीच्या सुपरकिंग्जना आपले पहिले स्थान गमवावे लागले. ते तिसऱ्या स्थानावर आहेत.

ऑरेंज कॅपचे मानकरी

सध्या हैदराबाद संघाचा धडाकेबाज फलंदाज डेव्डिड वॉर्नर ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी बंगळुरू विरुद्धात केलेल्या तुफान फलंदाजीच्या जोरावर पहिल्या स्थानावर आहे. वॉर्नर 264 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर, बेअरस्टोनं दिल्ली विरोधात केलेल्या तुफान गोलंदाजीच्या जोरावर 246 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पर्पल कॅपचे मानकरी

बंगळुरू संघ जरी, अंकतालिकेत शेवटच्या स्थानावर असला तरी, बंगळुरूचा गोलंदाज युजवेंद्र चहल पर्पल कॅपच्या रेसमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 4 सामन्यात 8 विकेट घेत चहल पहिल्या स्थानी आहे. तर दुसऱ्या चेन्नईचा इमरान ताहीर आहे. ताहीरनं आतापर्यंत 7 विकेट घेतल्या आहेत.

सैराट ते कागर, मेकओव्हरनंतरची 'आर्ची'ची पहिली UNCUT मुलाखत

First published: April 5, 2019, 10:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading