नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चं पहिलं चॅम्पियनपद मिळवल्यानंतर मात्र राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) मैदानावर फार जादू करू शकली नाही. एक तर टीमची कामगिरी चांगली होत नव्हती त्यामुळे टीमचं निलंबन करण्यात आलं. निलंबनानंतर वापसी झाल्यानंतरही टीमच्या कामगिरीत फार सुधार आल्याचे दिसले नाही. आयपीएलच्या 13 व्या सीजनसाठी फ्रेंचायजीने आपल्या टीममध्ये अनेक स्टार कलाकारांना घेतलं. मात्र प्रत्येक वेळी तरुण खेळाडूंना संधी देणारी राजस्थान रॉयल्स यांच्याकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. आयपीएलच्या या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्स 22 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्जच्या विरोधात आपल्या यशाचं अभियान सुरू करणार आहेत.
वाचा राजस्थान रॉयल्सचं संपूर्ण शेड्यूल
22 सप्टेंबर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, शारजाह
27 सप्टेंबर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, शारजाह
30 सप्टेंबर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध कलकत्ता नाइट राइडर्स, दुबई
3 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, अबु धाबी
6 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, अबु धाबी
9 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, शारजाह
11 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद, दुबई
14 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुबई
17 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, दुबई
19 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, अबु धाबी
22 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद, दुबई
25 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, अबु धाबी
30 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, अबु धाबी
1 नोव्हेंबर : राजस्थान रॉयल्सव विरुद्ध कलकत्ता नाइट रायडर्स, दुबई
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajasthan Royals